सावधान : एडीटींग ऍप्स करतायत तुमचा डेटा चोरी.... मेटाने दिली माहिती!
X
मेटाने म्हणजेच पुर्वाश्रमीच्या फेसबुकने आपल्या करोडो वापरकर्त्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. काही स्मार्टफोन ऍप्स हे फक्त आपला फेसबुकचा डेटा चोरण्यासाठी बनवले गेले आहेत आणि यात १० लाक वापरकर्ते या ऍप्सच्या संपर्काचत आले आहेत अशी माहिती मेटाने शुक्रवारी दिली.
अशा एकूण ४०० हुन अधिक ऍप्स आहेत जे स्मार्टफोन आणि ऍपल फोन साठी बनवण्यात आले आहेत. या सगळ्यांची ओळख मेटाने पटवली आहे. अशी माहिती मेटाचे मेटाचे थ्रेट डिसरप्शनचे संचालक डेविड अग्रावोनिच यांनी दिली आहे. हे सर्व ऍप लोकांना डाउनलोड करण्यासाठी भाग पाडता यावेत यासाठी एडिटींग, युटीलीटी, बिझनेस, व्हीपीएन, गेम असे विविध प्रकारे प्ले स्टोअर आणि ऍपल स्टोअर वर उपलब्द करण्यात आले.
हे ऍप्स डाऊनलोड केल्यानंतर वापरण्यासाठी फेसबुक लॉगिन करायला सांगतात आणि त्यानंतर युझर आयडी आणि पासवर्ड चोरतात. असं मेटाच्या सुरक्षा पथकाचं म्हणणं आहे. जे वापरकर्ते य़ा ऍप्स च्य़ा संपर्कात आले असतील त्या सर्वांना मेटा कळवणार आहे आणि सावधानतेचा इशारा देखील देणार आहे.
विशेषतः या सर्व ऍप्स पैकी ४० टक्के ऍप्स हे फोटो एडिटींग ऍप्स आहेत. असे ऍप बनवणारे फक्त फेसबुकच नाही तर इतर सेवांचे पासवर्ड आणि डेटा देखील चोरला जाऊ शकतो अशी शंका मेटा च्य़ा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पण मेटाने सांगितल्याप्रमाणे त्या पैकी बरेचसे ऍप्स हे प्ले स्टोअर वरून गुगल ने काढून टाकले आहेत अशी माहिती गुगल ने दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात सायबर गुन्ह्यांचं प्रमाण फार वाढत चाललं आहे त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे.