धोनीचा हा शेवटचा सामना आहे का?
X
काल IPL २०२३ चा फायनल सामना नरेंद्र मोदी स्टेडियम येथे अहमदाबादमध्ये खेळला झाला. चेन्नई सुपर किंग्स ने नाणेफेकी जिंकून पहिला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने पहिला फलंदाजी करताना चांगली कामगिरी बजावली. बी. साई सुदर्शन ने ४७ चेंडू खेळून ९६ धाव केल्या त्यात ८ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. साहाने आणि गिलने गुजरातला दणदणीत सुरवात करून दिली. साहाने ५४ तर गिल ने ३९ धावा केल्या. हार्दिक पंड्याने खाली येऊन संघाला अजून धावा जोडण्यास मदत केली.
गुजरातच्या एकूण २१४ धावा झाल्या होत्या. दुसरी इंनिंग सुरु होऊन तिनच चेंडू झालेले की पावसाचा वर्षाव पुन्हा एकदा सुरु झाला. तासाभरात सगळे चाहते निराश वाटत होते. त्यानंतर पाऊस थांबला आणि पंचानी दोन्ही संघांच्या कर्णधारांसह १५ षटकांचा खेळ करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईला आता २१५ ऐवजी १७१ धावांचा १५ षटकात पाठलाग करायचा होता. ऋतुराज आणि कॉनवेने चांगली सुरवात दिली. कॉनवे ने ४७ धावा करून CSK च्या फलंदाजी क्रमाचं नेतृत्व केलं. अजिंक्य राहणे देखील खूप वेगाने फलंदाजी करताना दिसला.
पण मोहित शर्माच्या चेंडूवर तो बाद झाला. शिवम दुबे आणि अंबाती रायडू वरती खूप मोठी जवाबदारी होती. रायडूने मोहित शर्मालाच २ षटकार आणि एक चौकार मारला, पण पूढच्या चेंडूवर तो बाद झाला. शेवटी येऊन नायक ठरला तो म्हणजे रवींद्र जडेजा शेवटच्या षटकात १३ धावा काढून विजेता ठरला. पण मोहित शर्माच्या चांगल्या गोलंदाजीने २ चेंडूत १० धावा असं गणित होत. तेव्हा रवींद्र जडेजाने एक षटकार आणि शेवटच्या चेंडूवर चौकार मारून सामना चेन्नईला जिंकला आणि चेन्नई IPL २०२३ चषक विजेता संघ ठरला.
सामान्य नंतर सादरीकरणात हर्षा भोगले ने एम एस धोनी ची मुलाखत घेतली, त्यात त्याने त्याच्या फूडच्या विचारानं बदल विचारलं , धोनी म्हणाला
" निश्चितच हा माझ्या कारकिर्दीचा शेवटचा टप्पा आहे , ह्या टप्प्यावर येऊन आता मी निवृत्ती घेतली पाहिजे , पण ह्या वर्षी जिथे जिथे मी गेलो तिथे मला माझ्या चाहत्यांच माझ्यावर असलेला अफाड प्रेम दिसलं, पाहुयात येत्या महिन्यात काई होतंय, माझ्या कडे अजून ८-९ महिने आहेत विचार करायला , माझ्या तब्ब्येती चा विचार करून मला परत फूडच्या IPL मध्ये सहभागी होता आला तर ते मी माझ्या चाहत्यांसाठी बक्षिसे म्हणून नक्की करिन, माझा साधेपणा माझी ओळख आहे आणि हाच साधेपणा माझ्या लाडक्या फॅन्स ना आवडतो."