Home > Sports > 6,6,6,6,4,6 अशी खेळी करत स्टीव्ह स्टॉकने ऋषभ पंतचा विक्रम तोडला...

6,6,6,6,4,6 अशी खेळी करत स्टीव्ह स्टॉकने ऋषभ पंतचा विक्रम तोडला...

Under 19 World Cup 2024 : भारत आणि साऊथ आफ्रिका या सामन्यादरम्यान, संघाचा सलामीवीर स्टीव्ह स्टोकने २३२ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याने अंडर-१९ विश्वचषकातील भारतीय स्टार फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंतचा झंझावाती अर्धशतकांचा विक्रम मोडला आहे.

6,6,6,6,4,6 अशी खेळी करत स्टीव्ह स्टॉकने ऋषभ पंतचा विक्रम तोडला...
X

Under 19 World Cup 2024 : भारत आणि साऊथ आफ्रिका saouth africa या सामन्यादरम्यान, संघाचा सलामीवीर स्टीव्ह स्टोकने २३२ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याने अंडर-१९ विश्वचषकातील भारतीय स्टार फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंतचा झंझावाती अर्धशतकांचा विक्रम मोडला आहे.

१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत शनिवारी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने स्कॉटलंडविरुद्ध scottland सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या संघाने ९ गडी गमावून २६९ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सलामीवीर स्टीव्ह स्टॉकची धमाकेदार सुरुवात आणि शेवटच्या डावात डेव्हन मारेसच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर अवघ्या २७ षटकांत ३ गडी गमावून विजय मिळवला. जेव्हा दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज मैदानात आले, तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी स्कॉटलंडच्या गोलंदाजांचा धुवा उडवला आहे.

आफ्रिकेच्या खेळाडूंनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला असून,चाहत्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू स्टीव्ह स्टॉकने धावांचे वादळ निर्माण केले आहे. स्टीव्हने स्कॉटलंडविरुद्ध अशी झंझावाती खेळी खेळली, जी कधीही विसरता येणार नाही. या फलंदाजाची ही खेळी इतिहासाच्या पानात कायमची नोंद झाली आहे.

असा तोडला ऋषभ पंतचा विक्रम

स्टॉकने स्कॉटिश गोलंदाजाच्या एका षटकात ३४ धावांचा पाऊस पाडला. स्टीव्हने या षटकात पाच षटकार आणि एक चौकार लगावला आहे. स्टीव्ह स्टॉकने केवळ झंझावाती खेळीच खेळली. त्याने या शानदार खेळीच्या जोरावर भारताचा स्फोटक फलंदाज ऋषभ पंतचा विक्रमही मोडीत काढला आहे. या सामन्यापूर्वी जो विक्रम ऋषभ पंतच्या नावावर होता, तो आता स्टीव्हने आपल्या नावावर नोंदवला आहे. १९ वर्षांखालील विश्वचषकात सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर होता. २०१८ च्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत त्याने नेपाळविरुद्ध अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. पंतने हा विक्रम सहा वर्षे राखला होता, मात्र आता दक्षिण आफ्रिकेच्या स्टीव्हने हा विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याने १३ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने ३७ चेंडूत ८६ धावांची खेळी साकारली.

Updated : 28 Jan 2024 3:52 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top