नीरज चोप्राची पदकांची लयलूट कायम जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य कमाई
X
अमेरिकेतील ओरेगॉन येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने रौप्य पदक जिंकून इतिहास घडवला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेक प्रकारात पदक जिंकणारा नीरज हा पहिला खेळाडू ठरला
मागील वर्षी टोक्यो ऑलिंपिक मध्ये सुवर्ण पदक जिंकून भालाफेक पटू नीरज चोप्राने इतिहास घडवला होता. त्यानंतर झालेल्या आणखी दोन स्पर्धांमध्ये निरजने रोप्या आणि सुवर्ण अशी पदक जिंकली आणि आता जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्यानं पुन्हा एकदा रौप्य पदकाची कमाई केली आहे ज्याप्रमाणे ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पहिल्यांदाच भारताच्या भालाफेक पटून ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकलं होतं त्याचप्रमाणे रविवारी देखील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक जिंकून नीरज ने इतिहास घडवलाय.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पहिल्याच प्रयत्नात 86 मीटरचा भाला फेकून नीरज अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता रविवारी अंतिम फेरीत त्याला पदकासाठी कष्ट घ्यावे लागले. अंतिम फेरीतली सुरुवात त्याची चांगली झाली नव्हती पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 83 मीटर आणि तिसऱ्या प्रयत्नात 86 मीटर त्याने भाला फेकला चौथा प्रयत्न 88.13 मीटरचा भाला फेकून रौप्य पदक निश्चित केलं. यानंतरच्या पाचव्या आणि सहाव्या प्रयत्नात देखील त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. ग्रीनडाच्या अँडरसन पीटर्स याने 90 मीटर पेक्षा अधिक अंतरावर भाला फेकून सुवर्णपदकाची कमाई केली आणि सलग दुसऱ्यांदा भालाफेकीत तो जगजेता झाला.
आता नीरजच लक्ष येत्या काही दिवसात सुरू होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेकडे असणार आहे. ऑलिंपिक प्रमाणे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये देखील मिरज कडून सुवर्णपदकाची आशा सर्व भारतीयांना आहे