Ind Vs NZ T-20 : भारतीय संघाने रचला इतिहास, न्यूझिलंडचा उडवला धुव्वा
भारत विरुध्द न्युझिलंड T-20 मालिकेत भारताने अखेरच्या सामन्यात न्यूझिलंडवर दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला आहे.
X
भारत विरुध्द न्युझिलंड T-20 मालिकेत भारताने अखेरच्या सामन्यात न्यूझिलंडवर दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला आहे.
India Vs New Zealand 3rd T-20 : भारत विरुध्द न्यूझिलंड यांच्यातील मालिकेतील अंतिम सामन्यात भारताने ऐतिहासिक विजय नोंदवला. यामध्ये भारताने 20 षटकात 4 बाद 235 धावांचे लक्ष दिले. यामध्ये शुभमन गिलने (shubhaman Gill) नाबाद 126 धावा पटकावल्या. या शुभमन गिलच्या 235 धावांच्या जोरावर भारताने दिलेल्या लक्षाचा पाठलाग करताना न्यूझिलंडचा डाव 12.1 षटकात आटोपला. याबरोबरच भारताने 168 धावांसह ऐतिहासिक विजय नोंदवला.
तीन T-20 सामन्यांच्या मालिकेत शेवटच्या सामन्यात भारताने 168 धावांनी विजय मिळवत नवा विक्रम रचला. यापुर्वी भारताने 2018 मध्ये आयर्लंडचा (India Vs Ireland) 148 धावांनी पराभव केला होता. मात्र आजवरच्या इतिहासातील हा न्यूझिलंडचा सर्वात मोठा पराभव आहे. यापुर्वी पाकने न्यूझिलंडचा 103 धावांनी पराभव केला होता. त्यामुळे भारताने न्यूझिलंडचा केलेला पराभव मोठी नामुष्की ठरली आहे.
𝐀 𝐰𝐢𝐧 𝐭𝐨 𝐫𝐞𝐦𝐞𝐦𝐛𝐞𝐫 😃
— BCCI (@BCCI) February 1, 2023
Congratulations to #TeamIndia who register their biggest T20I victory by margin of runs 👏👏#INDvNZ | @mastercardindia pic.twitter.com/mhMvpurJYk
भारतीय संघात शुभमन गिलने 126 नाबाद 126 तर हार्दिक पांड्याने (Hardik pandya) न्यूझिलंडच्या 4 विकेट घेतल्या. दुसरीक़े अर्शदीप सिंह, शिवम मावी, उमरान मलिक या त्रिकूटाने प्रत्येकी 2 बळी घेतले. त्यामुळे मालिक खिशात घालणे भारताला शक्य झाले.
हार्दिक पंड्याला (Hardik pandya) मॅन ऑफ द सीरीज (Man of the series) हा पुरस्कार देण्यात आला. तर शुभमन गिलला मॅन ऑफ द मॅच (Man of The Match) पुरस्कार देण्यात आला.
शुभमन गिलने न्यूझिलंड विरुध्दच्या सामन्यात झळकावलेले पहिले शतक आहे. शुभमन गिलने या खेळीसह विराट कोहलीला मागे टाकले आहे.