IND vs PAK T20 World Cup कोहलीच्या आतषबाजीने मेलबर्नमध्ये भारताचा 'विराट' विजय
X
मेलबर्न : भारत-पाकिस्तान मधील टी-२० विश्वचषक स्पर्धेतील बहुचर्चित सामना रनमशीन विराट कोहली (Virat Kohli) च्या तुफान बॅटिंगमुळे भारताने चार गडी राखून जिंकला. पाकिस्तान (Pakistan) च्या हातातोंडाशी आलेला विजय विराट कोहलीनं हिरावून तमाम भारतीयांची दिवाळी ख-या अर्थाने गोड केली.
भारताने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीलाच पाकिस्तानची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. त्यानंतर पाकिस्तानचे फलंदाज शान मसूद (Shan Masood) आणि इफ्तिखार अहमद (Iftiquar Ahmed) या दोघांनी अर्धशतकी खेळी करत पाकिस्तानच्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला. भारताकडून भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि मोहम्मद शमीने (Mohammad Shami) प्रत्येकी एक गडी बाद केला.
भारताचीही सुरूवात अत्यंत खराब झाली. मात्र, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी सयंमी फलंदाजीचं दर्शन घडवले. शेवटच्या षटकात भारतीय फलंदाजांनी समयसूचकता दाखवली. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) ने शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत भारताचा विजय सूकर केला.