Home > Sports > IND vs NZ Semi Final World Cup 2023 : वर्ल्ड कप फायनलमध्ये कोण मारणार धडक, भारत-न्यूझीलंडचा रनसंग्राम.

IND vs NZ Semi Final World Cup 2023 : वर्ल्ड कप फायनलमध्ये कोण मारणार धडक, भारत-न्यूझीलंडचा रनसंग्राम.

India vs New Zealand Semi-Final ICC world Cup 2023 Live Match Score : आज पहिला सेमी फायनल सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. या सामन्यात भारताकडे मागील सेमी फायनलमधील पराभवाचा वचपा काढण्याची चांगली संधी आहे.

IND vs NZ Semi Final World Cup 2023 : वर्ल्ड कप फायनलमध्ये कोण मारणार धडक, भारत-न्यूझीलंडचा रनसंग्राम.
X

वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत आणि न्यूझीलंड एकमेकांना भिडणार आहेत. पहिला सेमी फायनल सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळला जानार असून जो जिंकेल तो फायनलचं तिकिट घेणार आहे. दीड वाजता टॉस होत दोन वाजता सामन्याला सुरूवात होईल. 2019 साली भारताचा पराभव करत न्यूझीलंड संघाने फायनल गाठली होती. मात्र फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध अखेरच्या चेंढुपर्यंत गेलेल्या सामण्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आजच्या सामन्यात भारताकडे मोठी संंधी आहे. घरच्या मैदानावर खेळत असल्याचा भारतीय संघाला कितपत फायदा घेता येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

IND vs NZ: भारत उपांत्य फेरीत कधी-कधी पोहोचला आणि त्याचा सामना कोणाविरुद्ध झाला?

या विश्वचषकापूर्वी टीम इंडियाने १९८३, १९८७, १९९६, २००३, २०११ आणि २०१५ विश्वचषकात उपांत्य फेरी गाठली आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा सहा गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर अंतिम फेरीत वेस्ट इंडिजचा ४३ धावांनी पराभव करून विश्वचषक जिंकला. यानंतर १९८७ च्या विश्वचषकात भारताचा उपांत्य फेरीत इंग्लंडशी सामना झाला. त्यानंतर कपिल देवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला ३५ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

१९९६ च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना श्रीलंकेशी झाला होता. तेव्हा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन होता. मात्र, कोलकाता येथे झालेल्या या सामन्यात प्रेक्षकांनी गोंधळ घातला, त्यामुळे सामना रद्द करण्यात आला आणि श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आले. यानंतर २००३ च्या विश्वचषकात सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने उपांत्य फेरीत केनियाचा ९१ धावांनी पराभव केला होता. मात्र, अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा १२५ धावांनी पराभव केला. तसेच, २०११ च्या विश्वचषकात भारताचा उपांत्य फेरीत सामना पाकिस्तानशी झाला होता. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २९ धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव करून विश्वचषक जिंकला.

Updated : 15 Nov 2023 1:24 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top