ड्वेन ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली;T-20 विश्वचषकानंतर क्रिकेट कारकीर्दीला पूर्णविराम देणार
X
मुंबई : वेस्ट इंडिजचा खेळाडू ड्वेन ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. T-20 विश्वचषकानंतर क्रिकेट कारकीर्दीला तो पूर्णविराम देणार आहे. गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर स्वत: ब्राव्होने याबद्दलची माहिती दिली. 'आता निर्णयाची अंतिम वेळ आली आहे. माझ्या मते निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे'.असं ब्राव्होने म्हटले आहे.
सोबतच माझं करिअर चांगलं होतं. 18 वर्षे वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करणे ही मोठी गोष्ट आहे. या काळात अनेक चढउतारही पाहायला मिळाले. मात्र, मी कधीच मागे वळून पाहिले नाही. माझ्या कारकिर्दीत 3 आयसीसी ट्रॉफी जिंकणे ही मोठी कामगिरी होती. असं म्हणत ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे, मात्र निवृत्ती जाहीर करण्याची ही त्याची दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2018 मध्येही त्यांनी निवृत्तीची घोषणा केली होती, परंतु 2019 मध्ये पुन्हा त्याने आपला निर्णय मागे घेतला.
ब्राव्हो 2012 आणि 2016 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचा भाग होता. तो आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 6 नोव्हेंबरला T-20 सामना म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.