Home > Sports > IPL 2021: चेन्नईचे किंग्स आज भिडणार दिल्लीच्या नवाबांशी

IPL 2021: चेन्नईचे किंग्स आज भिडणार दिल्लीच्या नवाबांशी

IPL 2021: चेन्नईचे किंग्स आज भिडणार दिल्लीच्या नवाबांशी
X

मुंबई : IPL 2021चा 14 वा हंगाम आता अगदी अंतिम टप्प्यात आला आहे. आज होणाऱ्या सामन्यातून तर अंतिम सामन्यात खेळणारा पहिला संघही मिळणार आहे. आजचा सामना गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (CSK vs DC) यांच्यात खेळवला जाणार आहे.या दोन्ही संघांच्या सर्वच खेळाडुंनी IPLमध्ये उत्तम कामगिरी केल्याने आजचा सामना देखील धमाकेदार सामना होणार आहे.

दोन्ही संघाच्या गुणतालिकेतील स्थानाचा विचार करता दिल्लीच्या संघाने 14 पैकी 10 सामन्यात विजय मिळवत 20 गुणांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. तर चेन्नईच्या संघाने 14 पैकी 9 सामने जिंकत 18 गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे. प्लेऑफमध्ये गेलेल्या आरसीबी आणि केकेआर यांच्यापेक्षा दोघांचे गुण अधिक असल्याने या दोघांच्यातील विजयी संघाला थेट अंतिम सामन्यात जाण्याची संधी मिळणार आहे.

आज होणाऱ्या सामन्यात CSK आणि DC यांच्यातील विजेता संघ थेट अंतिम सामन्यात जाणार असून पराभूत होणाऱ्या संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. सोमवारी होणाऱ्या KKR vs RCB या दुसऱ्या प्लेऑफच्या सामन्यात विजेता संघासोबत आजच्या पराभूत संघाला सामना खेळून पुन्हा एकदा अंतिम सामन्यात जाण्याची संधी मिळणार आहे.

Updated : 10 Oct 2021 4:48 PM IST
Next Story
Share it
Top