भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघादरम्यान 15 वर्षांनंतर कसोटी सामना
X
मुंबई : भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघादरम्यान तब्बल 15 वर्षांनंतर कसोटी सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार आज सकाळी 10 वाजता क्विन्सलॅन्ड मैदानावर हा सामना सुरु होईल. महत्वाचं म्हणजे हा सामना पिंक बॉलवर खेळवला जाणार असून भारतीय महिला संघ पहिल्यांदाच पिंक बॉलवर खेळणार आहे.
भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. तिसरा एकदिवसीय सामना जिंकून भारताने ऑस्ट्रेलिया विरोधातल्या सलग 26 सामन्यांच्या पराभवाची मालिका खंडित केली आहे. भारतीय महिला संघाचा आत्मविश्वास जोरदार आहे. मात्र भारतीय संघ पहिल्यांदा पिंक बॉलवर खेळत असल्याने त्यांचा कसोटी सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल.
भारत आणि ऑस्ट्रिलिया महिला संघादरम्यान 2006 साली शेवटचा कसोटी सामना झाला होता. आता तब्बल 15 वर्षांनंतर हे दोन्ही संघ एकमेकांसमोर येणार आहेत. आता हा ऐतिहासिक कसोटी सामना कोण जिंकत हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. भारताच्या झुलन गोस्वामी आणि ऑस्ट्रेलियाच्या ईलाइस पेरी यांच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. भारतीय संघाला हरमनप्रितशिवाय खेळावं लागणार आहे.