Home > Sports > भारतीय संघाचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ चे रणजीमध्ये त्रिशतक...

भारतीय संघाचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ चे रणजीमध्ये त्रिशतक...

भारतीय संघाचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ चे रणजीमध्ये त्रिशतक...
X

भारतीय संघाचा तरुण सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आणि आसाम या दोन रणजी संघामध्ये सामना सुरु आहे. आज त्याने त्रिशतकी खेळी करुन सर्वांनाचं आश्चर्यांचा धक्का दिला. आणि भारतीय निवड समितीला आपल्या खेळाची नवी चुणूक दाखवून दिली. याअगोदर न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याला संधी न मिळाल्याने त्याने नाराजी व्यक्त केली होती. पृथ्वी शॉ ने रणजी ट्रॉफीमध्ये माजी खेळाडू संजय मांजरेकर यांचा ३७७ धावांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. आणि रणजीच्या इतिहासात दुसऱ्या क्रमांकावर आपली जागा तयार केली आहे.

आसामच्या संघाने नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर खेळण्यासाठी आसाम संघाने आमंत्रित केले. त्यानंतर पृथ्वी शॉने आपल्या तळपत्या बॅटने त्रिशतक ठोकले आणि सर्वांना आपल्या खेळाने मंत्रमुग्ध केले. पृथ्वी शॉ ने ३४१ चेंडूत ३१६ धावा करुन अद्यापही खेळपट्टीवर टिकून आहे. विशेष बाब म्हणजे पृथ्वी शॉ ने त्यांच्या त्रिशतकी खेळामध्ये एकूण ४३ चौकार आणि २ षटकार मारले. तर मराठमोळ्या अजिंक्य राहणेने शानदार शतक झळकावून युवा खेळाडू पृथ्वी शॉ ला चांगली साथ दिली.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईचा कर्णधार अजिंक्य राहणे आणि पृथ्वी शॉ नाबाद परतले होते. दुसऱ्या दिवशी खेळाची सुरवात होताच राहणेने आपले शतक पूर्ण केले. तर पृथ्वीने आपले त्रिशतक पूर्ण केले. आसामच्या मुख्तार हुसैन वगळता कोणत्याच गोलंदाजाला अद्याप मुंबईच्या खेळाडूंना बाद करण्यात यश मिळालेले नाही. तर अरमान जाफरला धावबाद करण्यात आसमाच्या संघाला यश आले. पृथ्वी शॉ ने पहिल्या सत्राच्या अखेरीस शतक पूर्ण करुन मुंबईला एका मजबूत स्थितीत नेले होते. खरं तर मुंबईचा संघ मराठमोळ्या अजिंक्य राहणेच्या नेतृत्त्वाखाली रणजी ट्रॉफीच्या रिंगणात उतरला आहे.

Updated : 11 Jan 2023 12:55 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top