इमर्जिंग आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानचा चुरशीचा सामना रंगणार
X
क्रिकेटच्या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अटीतटीचा सामना पुन्हा एकदा होणार आहे. हा सामना इमर्जिंग आशिया कपच्या मंचावर होणार असून, भारत अ संघाची स्पर्धेतील सुरुवात पाकिस्तान अ विरुद्धच्या सामन्याने होणार आहे. हा सामना ओमान क्रिकेट अकादमी मैदानावर, मस्कतमध्ये खेळला जाईल.
इमर्जिंग आशिया कप १८ ऑक्टोबरला हाँगकाँग विरुद्ध बांगलादेशच्या सामन्याने सुरू झाला, ज्यामध्ये बांगलादेश अ संघाने ५ गडी राखून विजय मिळवला. या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले आहेत, जे दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. अ गटात बांगलादेश अ, अफगाणिस्तान अ, श्रीलंका अ आणि हाँगकाँग आहेत, तर ब गटात भारत अ, पाकिस्तान अ, ओमान आणि युएई आहेत.
भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यातील सामना १९ ऑक्टोइमर्जिंग आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानचा चुरशीचा सामना रंगणारबर रोजी संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. या सामन्यातून दोन्ही संघांच्या ताकदीची चुणूक पाहायला मिळेल. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी प्रत्येक गटातील अव्वल २ संघांची निवड केली जाईल.
भारत अ संघाचे इमर्जिंग आशिया कपमधील वेळापत्रक
भारत अ वि पाकिस्तान अ – १९ ऑक्टोबर – संध्याकाळी ७ वाजता
भारत अ वि युएई – २१ ऑक्टोबर – संध्याकाळी ७ वाजता
भारत अ वि ओमान – १९ ऑक्टोबर – संध्याकाळी ७ वाजता
इमर्जिंग आशिया कपमधील भारत अ व पाकिस्तान अ यांच्यातील सामना १९ ऑक्टोबर म्हणजे आज संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. तर मोठी गोष्ट म्हणजे इमर्जिंग आशिया कपचे लाईव्ह प्रक्षेपण कोणत्याही स्पोर्ट्स चॅनेलद्वारे टीव्हीवर टेलिकास्ट होणार नाही. पण या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग फॅनकोड या अॅपवर पाहता येईल.