Home > Politics > ऐतिहासिक चित्रपटांवरून राजकारण पेटलं, संभाजीराजे छत्रपती पाठोपाठ जितेंद्र आव्हाड ही भडकले

ऐतिहासिक चित्रपटांवरून राजकारण पेटलं, संभाजीराजे छत्रपती पाठोपाठ जितेंद्र आव्हाड ही भडकले

देशात एकापाठोपाठ एक ऐतिहासिक चित्रपट निर्माण होत आहेत. त्यापार्श्वभुमीवर ऐतिहासिक चित्रपटांवरून राज्यात राजकारण तापले आहे.

ऐतिहासिक चित्रपटांवरून राजकारण पेटलं, संभाजीराजे छत्रपती पाठोपाठ जितेंद्र आव्हाड ही भडकले
X

गेल्या काही वर्षांपासून देशात मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक चित्रपटांची (Historical Cinema) निर्मीती होत आहे. त्यातच सध्या सुबोध भावे (subodh Bhave) यांची मुख्य भूमिका असलेला 'हर हर महादेव' (Har Har Mahadev Marathi Movie) आणि महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी दिग्दर्शित केलेला 'वेडात वीर दौडले सात' (Vedat Veer daudale sat marathi Movie) या चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje Chhatrapati) यांनी पुण्यात (pune) एका पत्रकार परिषदेत केला. एवढंच नाही तर संभाजी राजे छत्रपती यांनी मराठी चित्रपट (Marathi Movie) निर्माते आणि दिग्दर्शकांना थेट इशाराच दिला आहे.

संभाजी राजे छत्रपती म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati Shivaji maharaj) किंवा मावळ्यांवर आधारित चित्रपटात इतिहासाशी छेडछाड केली जाऊ शकत नाही. हर हर महादेव या चित्रपटात इतिहासाची मोडतोड आणि ऐतिहासिक घटनांचा विपर्यास केला आहे. मात्र अशा प्रकारचे चित्रपट लोकांसमोर नेले जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आपली अस्मिता आणि प्रेरणा आहेत. त्यामुळे सिनेमॅटिक लिबर्टीच्या (cinematic liberty) नावाने आपण इतिहासाचा गाभा सोडता कामा नये, असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP leader Jitendra awhad tweet) यांनी ट्वीट करून ही इतिहासाच्या मोडतोडीची परंपरा बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्यापासून सुरु असल्याचा आरोप केला.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, महाराष्ट्रात शिवाजी महराजांचा चुकीचा,खोटा, इतिहास मांडण्याची परंपरा पुरंदरे ह्यांनी सुरु केली. जाणता राजा हे महानाट्य हे त्याचे एक रुप. कारण त्यांचे लिखित पुस्तक होतेच. तीच परंपरा आता चित्रपटसृष्टीत काही जण करत आहेत. आम्ही विरोध करुच. पण संभाजीराजे ह्यांच्या रुपाने एक आवाज मिळाला आहे.

Updated : 7 Nov 2022 7:47 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top