अधिकाऱ्यांना धमकी देणं खपवून घेणार नाही: यशोमती ठाकूर यांचा अनिल बोंडेंना इशारा
X
भाजप नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी एका आंदोलनात वादग्रस्त विधान केल्याचे समोर आले आहे. गटविकास अधिकाऱ्याला कार्यालयात जाऊन फटके मारू असं विधान बोंडे यांनी केला आहे. त्यांच्या याच विधानावर प्रतिक्रिया देतांना अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी,अधिकाऱ्यांना धमकी देणं खपवून घेतलं जाणार नाही,असा इशारा बोंडे यांना दिला आहे.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितील रोजगार हमी योजनेतील कंत्राटी तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबुरकर यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण मिळत आहे. अधिकारी मृत्यू प्रकरणात गटविकास अधिकाऱ्यावर कारवाई केली नाही तर, कार्यालयात जाऊन फटके मारू असे,बोंडे म्हणाले होते.
यावर बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्यात की, अनिल बोंडे यांचं वक्तव्य चुकीचं आहे. ते त्यांच्या पक्षाची संस्कृती काय आहे ते दाखवत आहेत. मागासवर्गीय समाजाचा अधिकारी तिथे आहेय. बोंडे अरेरावी करत असतील तर आम्ही तसं होऊ देणार नाही. या प्रकरणातील जो अधिकारी होता तो सस्पेंड झाला होता, तो अरेरावीची भाषा करत होता. त्यांचं अपघाती निधन झालं ते दुर्दैवी आहे. मात्र, अधिकाऱ्यांना धमकी देणं खपवून घेतलं जाणार नाही, असं अमरावतीच्या यशोमती ठाकूर म्हणाल्या.