Home > Politics > नवजोत सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंह कलह थांबेना, मुख्यमंत्र्यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट

नवजोत सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंह कलह थांबेना, मुख्यमंत्र्यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट

नवजोत सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंह कलह थांबेना, मुख्यमंत्र्यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट
X

Punjab: पंजाब (Punjab) चे मुख्‍यमंत्री कॅप्‍टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) आज पंजाब सरकारमधील कॅबिनेटच्या फेरबदला संदर्भात कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली.

पंजाब कॉंग्रेस चे नवनियुक्‍त अध्‍यक्ष आणि नवजोत सिंह सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यामधील मतभेद अद्यापपर्यंत संपलेले नसल्याचं समोर आले आहेत. त्यामुळं हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

उभय नेत्यांमध्ये संधी झाल्याचं बोललं जात होतं. मात्र, सोमवारी नवजोत सिंह सिद्धू यांनी एक ट्वीट केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी अकाली दलाचे नेते विक्रम मजीठिया आणि अन्‍य आरोपींवर कार्रवाई का केली नाही. असा सवाल करत कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यावर निशाणा साधला. हे सर्व नेते 2018 च्या ड्रग ट्रैफिकिंग केस मध्ये सहभागी होते. नवजोत यांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचं नाव न घेता त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

गेल्या महिन्यात पंजाब कॉंग्रेसमध्ये झालेल्या अंतर्गत कलहानंतर नवजोत सिंह सिद्धू यांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी नेमण्यात आलं होतं. त्यावेळी नवजोत सिंह यांनी आपण मुख्यमंत्र्यांच्या खाद्याला खांदा लावून काम करु असं म्हटलं होतं. मात्र, तसं होताना दिसत नाही. या बैठकीनंतर कॉंग्रेस चे पंजाबचे प्रभारी हरीश रावत यांनी सांगितलं की...

कॉंग्रेस प्रमुखांनी राज्य सरकार आणि संघटन एक साथ चालायला हवं. दोनही नेत्यांना आपआपल्या सीमांचं विचार करुन काम करावं. अशी माहिती हरीश रावत यांनी दिली आहे.

Updated : 11 Aug 2021 1:13 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top