Home > Politics > मोदी सरकारनंतर ठाकरे सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करावे : किरीट सोमय्या

मोदी सरकारनंतर ठाकरे सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करावे : किरीट सोमय्या

मोदी सरकारनंतर ठाकरे सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करावे :  किरीट सोमय्या
X

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी शंभरी पार केल्यानंतर दरकपात न करणाऱ्या मोदी सरकारने काही राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमधील पराभवानंतर पेट्रोल आणि डिझेलवरील दर कमी केले आहेत. यानंतर काही भाजपशासित राज्यांनीही आपापल्या राज्यात व्हॅट कमी करत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले आहेत. यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता ठाकरे सरकारकडे पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्याची मागणी केली आहे.

" महाराष्ट्र सरकार प्रती लिटर पेट्रोलवर ₹29.25 एवढी कर आकारणी करत आहे व केंद्र सरकार ₹32.90 एवढी कर आकारणी करते. जर केंद्र सरकारने पेट्रोल/ डिझेल वरील करामध्ये कपात केली आहे तर आता ठाकरे सरकार सुद्धा करात कपात करणार का?"


असा सवाल त्यांनी ट्विटरवरुन विचारला आहे. किरीट सोमय्या यांनी काही महिन्यांपूर्वी माहितीच्या अधिकारांतर्गत मिळवलेल्या माहितीमध्ये राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करासंदर्भात माहिती दिली होती. त्यानुसार राज्य सरकार पेट्रोलवर प्रति लिटर २९. २५ पैसे एवढा कर लावत आहे. पण आता केंद्र सरकारने आपला कर ५ रुपयांनी कमी केल्यानंतर राज्य सरकार कपात करणार का, असा सवाल सोमय्या यांनी विचारला आहे.

Updated : 4 Nov 2021 2:34 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top