Home > Politics > शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ खासदारही करणार बंड?

शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ खासदारही करणार बंड?

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फुट पडली आहे. तर 40 पेक्षा अधिक आमदारांचा एकनाथ शिंदे यांना पाठींबा असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ आता खासदारही बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ खासदारही करणार बंड?
X

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना उध्दव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची असा सवाल चर्चिला जात आहे. दरम्यान आपल्याकडे 40 पेक्षा जास्त आमदारांचा पाठींबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यापार्श्वभुमीवर 17 खासदार आणि 400 पेक्षा अधिक नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी उध्दव ठाकरे यांना आवाहन केले होते. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, शिवसेनेचे आमदार हे हिंदूत्वाच्या अजेंड्यावर मोठा निर्णय घेण्याची विनंती करीत आहेत. हे कट्टर शिवसैनिक असून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता त्यांना समजून घ्यावे. तसेच भाजपाशी युती करण्याचा निर्णय अवघड असला तरी तो घ्यावा, असं मत व्यक्त केले होते. त्यामुळे खासदार भावना गवळी यासुध्दा एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आणखीही शिवसेनेचे खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यापार्श्वभुमीवर शिवसेनेकडून खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हास्तरावर घेण्यात येत असल्याची चर्चा आहे. तर ठाणे-पालघरमधील अनेक नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याचे ठाण्यातील एका नगरसेवकाने सांगितले आहे.

Updated : 24 Jun 2022 9:30 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top