संजय राऊत यांच्या प्रश्नावर उदयनराजे गप्प का?
गेल्या काही दिवसांपुर्वी संजय राऊत विरुध्द उदयनराजे असा संघर्ष रंगला होता. मात्र या संघर्षानंतर अजूनही संजय राऊत यांच्याकडून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मात्र यावर उदयनराजे यांनी मौन बाळगले आहे.
X
राज्यात एकनाथ शिंदे गट विरुध्द ठाकरे गट संघर्ष रंगला आहे. तर राज्यात पुरस्थिती निर्माण झाली असताना मंत्रीमंडळाचा विस्तार न झाल्याने संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यावरून उदयनराजे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राष्ट्रपतींचा शपथविधी झाल्यानंतर निश्चितच तीन ते चार दिवसात मंत्रीमंडळाचा विस्तार होईल. तसेच हे सरकार कोसळणार असल्याचे म्हटले जात असले तरी हे सरकार कोसळणार नाही. मात्र या सरकारला दृष्ट लागू नये म्हणून ही टीका सुरू आहे. मात्र काळजी करू नका, हे सरकार नक्की पडेल, असं वक्तव्य उदयनराजे यांनी केले. मात्र यावेळी संजय राऊत यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर मात्र उदयनराजे यांनी मौन बाळगले.
गेल्या काही दिवसांपुर्वी संजय राऊत विरुध्द उदयनराजे वाद पेटला होता. तर संजय राऊत यांनी उदयनराजे यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देतांना मी संजय राऊत यांना ओळखत नाही, असं वक्तव्य उदयनराजे यांनी केलं होतं. त्यावरून हा संघर्ष टोकाला गेला होता. मात्र शिंदे-फडणवीस सरकारवर संजय राऊत टीका करत असताना उदयनराजे यांनी मी त्यांच्यावर काय बोलणार असं वक्तव्य केलं. त्यामुळे उदयनराजे संजय राऊत यांच्याविषयीच्या प्रश्नावर गप्प का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.