Home > Politics > महाराष्ट्रात महिला मंत्री का नाही? पंतप्रधान मोदींना सेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा सवाल!

महाराष्ट्रात महिला मंत्री का नाही? पंतप्रधान मोदींना सेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा सवाल!

महाराष्ट्रात महिला मंत्री का नाही? पंतप्रधान मोदींना सेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा सवाल!
X

सोमवारी देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन देशभर साजरा केला जातोय. प्रथेप्रमाणे याही वर्षी लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आहे. या ध्वजारोहणानंतर पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणाला सुरूवात केली. त्यांच्या या भाषणात त्यांनी महिला सन्मान, भ्रष्टाचारासारख्या मुद्द्यांवर भाष्य केलं पण त्यांच्या या भाषणाचा शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे महिलांचा सन्मान करायचा असेल तर तो महाराष्ट्रातून व्हायला पाहीजे. सध्याच्या महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळात एकाही महिला आमदाराला संधी मिळालेली नाही. सध्याच्या मंत्रीमंडळात राज्याचं महिला व बालकल्याण खातं एका पुरूषाकडे आहे. एकीकडे पंतप्रधान महिला सन्मानाच्या गोष्टी करतात तकर दुसरीकडे देशात सुली बाई बुली बाई होत आहे, असं म्हणत त्यांनी पंतप्रधानांना महिलांवर होत असलेल्या सायबर हल्ल्यांची आठवण करून दिली. या शिवाय त्यांनी स्थानक स्वराज्य संस्थांप्रमाणे राजकारणात महिलांना ३३ टक्के आरक्षण द्या अशी मागणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचारासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर टीका करताना प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजप कार्यालयात मोठी वॉशिंग मशीन लावली आहे. महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांच्या केसेस केंद्रीय यंत्रणांनी थंड बस्त्यात ठेवून दिल्या. भ्रष्टाचाराचे आरोपी असलेले लोक आता भाजपला भ्रष्टाचार पार्टी बनवत आहेत याचं काय कराल असा सवालच विचारला आहे.

याशिवाय प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपमध्ये होत असलेल्या परिवारवादावर देखील भाष्य केलं. देशातील अनेक परिवार आहेत. यांची दुसरी तिसरी पिढी भाजपा शी जोडले गेले आहेत. राजनाथ सिंह, अमित शहा, अनुराग ठाकूर, ज्योदिरादित्य सिंधीया, मुंडे, महाजन परिवाराची उदाहरणं देऊन भाजपच्या परीवारवादावर त्यांनी निशाणा साधला. शिवसेना, टीएमसी, आरजेडी, डीएमके,कॉंग्रेसच्या नेतृत्वांना जनतेने निवडून दिलं आहे आणि आपण जनतेचा अपमान करत आहात.

देशातील वाढतं धार्मिक ध्रुवीकरण आणि महागाईवर देखील प्रियंका चतुर्वेदी बोलल्या. देशात आता ध्रुवीकरणाचं मॉडेल तयार झालं आहे. देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. मोदींनी देशातील महागाई, ध्रुवीकरणावर बोलायला पाहिजे. मोदींच्या कथनी आणि करनी मध्ये फरक असल्याचं देखील त्या म्हणाल्या.

Updated : 15 Aug 2022 3:35 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top