Dr. Manmohan Singh : राज्यसभेत डॉ. मनमोहन सिंह बसतात शेवटच्या ओळीत, पण का?
संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह राज्यसभेत शेवटच्या ओळीत बसत असल्याचे दिसून आले. डॉ. मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान पद भुषवलं आहे. तरी पण त्यांची जागा कुणी बदलली? डॉ. मनमोहन सिंह शेवटच्या ओळीत का बसतात? नेमकं काय आहे कारण? जाणून घेण्यासाठी वाचा...
X
संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन (Budget Session 2023) सुरु आहे. या अधिवेशनात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह (Dr. Manmohan Singh) हे शेवटच्या ओळीत बसल्याचे दिसून आले. तर पुढच्या ओळीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P.Chidambaram) आणि दिग्विजय सिंह (Digvijay Singh) हे बसले आहेत. याविषयी माहिती घेतली असता, डॉ. मनमोहन सिंह यांनीच आरोग्याच्या कारणास्तव आपली राज्यसभेत (Rajyasabha seat) बसण्याची जागा बदलून घेतली.
काँग्रेस (Congress) नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. मनमोहन सिंह यांना राज्यसभेत पुढच्या ओळीत येण्यासाठी अडचण येत होती. त्यामुळे मनमोहन सिंह यांनीच पंतप्रधान कार्यालयाकडे (PM Office) आपली जागा बदलून शेवटच्या ओळीत देण्याची मागणी केली होती. ज्यामुळे त्यांची व्हीलचेअर सहजरीत्या मागच्या ओळीत आणणे आणि नेणे शक्य होईल.
हिवाळी अधिवेशनातही माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी आपली सीट बदलण्याची मागणी केली होती. मात्र त्यावेळी सीट बदलली गेली नव्हती. मात्र आता ही सीट बदलण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. मनमोहन सिंह हे मागच्या रांगेत बसल्याचे दिसून येते.