Home > Politics > एकनाथ खडसेंमुळे महाविकास आघाडीला धोका आहे असं चंद्रकांत पाटील का म्हटले?..

एकनाथ खडसेंमुळे महाविकास आघाडीला धोका आहे असं चंद्रकांत पाटील का म्हटले?..

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आलं खरं, पण अनेक भागात स्थानिक राजकारणामुळे आघाडीत बिघाडी होतांना दसत आहे. सत्ता टिकवणासाठी नेते मंडळींना रोज कसरत करावी लागत आहे, तर खालचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावरची लढाई आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहचली आहे. स्थानिक लढाई कुठं पर्यंत पोहचेल हे येणारा काळच ठरवणार आहे, प्रतिनिधी संतोष सोनवणे यांचा रिपोर्ट..

एकनाथ खडसेंमुळे महाविकास आघाडीला धोका आहे असं चंद्रकांत पाटील का म्हटले?..
X

जळगाव जिल्ह्याच वातावरण तर हातघाईवर पोहचले आहे. बोदवड नगरपंचायत निवडणूक आणि त्यानंतर सुरू झालेला आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना मधील वाद आता विकोपाला गेला आहे. अवैध व्यवसायावरून सुरू झालेला वाद निवेदनावरून विधानसभेत आणि त्यानंतर हल्ला आणि पोलीस ठण्यापर्यंत पोहचला आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितलं की खडसें कुटुंबाकडून जीवाला धोका आहे, न्याय नाही मिळाला तर माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे हे वाक्य एखादा आमदार विधानसभेत बोलतो हे अत्यंत गंभीर आहे, त्याची सभापतींनी दखल घेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना उत्तर देण्याच सांगितलं. त्याच दिवशी खडसेंच्या कन्या रोहिणी खडसें यांच्या कार वर जीव घेणा हल्ला झाला, हा योगायोग म्हणावं की, पुढची राजकीय दिशा ठरवणारी ठरवणार आहे, ह्या हल्ल्या प्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला.




2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळचे भाजपा विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी 25 वर्षाची हिंदुत्वाच्या मुद्दयावर एकत्र असलेली भाजप शिवसेना युतीची मोडल्याची घोषणा केली होती आणि त्याच वेळेस युतीमध्ये कायमचा मिठाचा खडा पडला तो आज पर्यंत कायम आहे. आता महाविकास आघाडीत खडसेंमुळेच महाविकास आघाडीला धोका असल्याचं गंभीर वक्तव्य शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील केलं, ह्या वक्तव्यामुळे खडसेंच चिडले.

विशेष म्हणजे 2019 च्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील हे मुक्ताईनगर मतदार संघातून महाविकास आघाडीचे अपक्ष उमेदवारी होते , भाजपने खडसेंचा पत्ता कट करत कन्या रोहिणी खडसें-खेवलकर यांना शेवटच्या क्षणी भाजप कडून उमेदवारी मिळाली मात्र चंद्रकांत पाटील यांनी खडसेंचा पराभव केला. खडसेंचा पराभव करण्यासाठी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस समर्थन तर भाजप कडून छुपी मदत चंद्रकांत पाटील यांना मिळाली होती.

काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, या सरकारला दोन वर्ष झाली, मात्र तिघा पक्षातील नेत्यांच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीत अंतर्गत प्रचंड कलह अनेकदा समोर आला. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात आणखीन समोर आले. राज्यात सत्तेत मांडीला मांडी लावून कारभार करत असले तरी स्थानिक पातळीवर एकमेकांचे पक्के राजकीय वैरी असल्याचं चित्र आहे. त्याची पहिली ठिणगी आहे.शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते एकनाथ खडसे महाविकास जळगाव जिल्ह्यात पडली आहे. बोदवड नगरपंचायत निवडणूक प्रचार महाविकास आघाडी सरकारमध्ये घटक असलेले राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा वाद विकोपाला गेला आहे.

अवैध धंद्यावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेस मध्ये मिठाचा खडा

राजकीय कार्यकर्त्यांचे अवैध धंदे आणि ह्या अवैध धंद्याना राजकीय पाठबळ असत हे सर्वसृत आहे.हाच कळीचा मुद्दा सद्या जळगाव जिल्ह्यात बनला आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ने एकमेकांचे अवैध धंदे सुरू आहेत, ते बंद करण्यासाठी जिल्ह्याधिकारी पासून ते त्यांचे सरकार असलेल्या गृहमंत्र्यांना निवेदन दिली आहेत.कोनाकोणाचे आणि कुठे हे व्यवसाय आहेत दोघांनाही माहीत आहेत. निवेदणाऱ्यांचेच सरकार असल्याने पोलिसही काही करू शकत नाही पोलिसांवर राजकीय दबाव आहे मात्र मान्य करत नाही.खडसें आणि पाटील या दोघा नेत्यांच्या वैयक्तीक भांडणात अवैध व्यवसायावरून आघाडी सरकारचीच बदनामी होतेय. हे मात्र नक्की ..

महाविकास आघाडीला कोना कडून धोका आहे हे लवकरच कळेल- चंद्रकांत पाटील





एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने खडसें आघाडीचे महत्वाचे नेते आहेत मात्र जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात फारसं काही आलबेल नाही, जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना एकमेकांना पाण्यात पाहतात, मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांच राजकीय वैर सर्वसृत आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंवर गंभीर आरोप केला आहे .खडसेंनी शिवसेना भाजप युतीचे दोन तुकडे केले तसच महाविकास आघाडीतही तेच बिघाडी करतील असा गंभीर आरोप केला आहे. बोदवड नगरपंचायत निवडणुकी खडसेंनी अगोदरच स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला, आघाडीचा फार्मूला ठरला असतांनाही आघाडी केली नाही, कधी शिवसेनेशी अथवा काँग्रेस शी कधी बोलले नाही, खडसें च नाव न घेता महाविकाला त्यांच्यातापासून कोणाकडून धोका आहे येत्या काही दिवसात समजेल अस वक्तव्य पाटील यांनी केलं. महाविकास आघाडी मोठया नेत्यांनी वेगळा दृष्टीकोन ठेऊन आघाडी केली आहे, खडसें समर्थकांचेच अवैध धंदे असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

आमदार चंद्रकांत पाटील यांचे सर्वत्र दोन नंबरचे धंदे आमदार चंद्रकांत पाटील हे गद्दार आहेत राष्ट्रवादीच्या मेहरबानी आमदार - एकनाथ खडसें चंद्रकांत पाटील हे शिवसेनेचे नाहीत तर अपक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या मेहबानी मुळे निवडून आले आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केला

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या ड्रायव्हरनेच 'त्या' महिलेशी अश्‍लील भाषेत संभाषण केले असून त्या ऑडिओ क्लीप्स आपल्याकडे आहेत. यातील एका क्लीपमध्ये महिलेच्या नवर्‍यास तो व्यक्ती त्याच्या पत्नीला आमदारांकडे पाठविण्याचे स्पष्टपणे सांगत आहे. यामुळे आमदारांनी राजीनामा द्यावा, एकनाथ खडसे यांनी आमदारांवर आरोप केला मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व दोन नंबरचे धंदे हे आमदारांच्या समर्थकांचेच आहेत. आम्ही याबाबत तक्रार केली. आपल्यावर कोणत्याही प्रकारचे गंभीर गुन्हे नाहीत.

दरमान्य मुक्ताईनगर मधील एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद नवीन नाही भाजप सेना युती असतांनाही हा वाद होता मात्र युतीच्या वरिष्ठ नेत्यांमुळे कधी एवढा विकोपाला गेला नाही. एकनाथ खडसें राष्ट्रवादीत गेल्यानंतर हा वाद पुन्हा वाढला , हा वाद जनतेच्या विकासासाठी नसून वैयक्तीक आणि राजकीय अस्तित्वाची ही लढाई आहे.

राजकीय विश्लेषकांचे प्रतिकिया

पुण्यनगरीचे खान्देश आवृत्तीचे संपादक विकास भदाणे सांगतात की खडसेंच्या कन्या रोहिणी खडसें ह्या निसटत्या मतांनी पराभूत झाल्या. ही सल खडसे यांना आजही आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार राजकिय संघर्ष सुरू आहे. खडसे गेले तीस वर्षे मुक्ताईनगर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत होते. मात्र भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी घोटाळ्यात खडसेना मंत्रिपद गमवावे लागले. त्यातच २०१९ च्या निवडणुकीत भाजपने खडसेंचे तिकीट कापून कन्या ऍड. रोहिणी खडसे यांना तिकीट दिले.




रोहिणी निसटत्या मतांनी पराभूत झाल्या. ही सल खडसे यांना आजही आहे. त्यातच उत्तर महाराष्ट्रात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री एकनाथ खडसे यांना वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला. गेले वर्षभर खडसेना कुठलंही पद मिळालं नाही. किंबहुना विधान परिषदेवर जाण्यासाठीचा मार्गही त्यांचा मोकळा झाला नाही. त्यामुळे स्वाभाविक खडसे आता अस्वस्थ झाले असून संघर्ष हाच राजकीय इतिहास असलेले खडसे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि खडसे यांच्यात अवैध व्यवसायावरून वाकयुद्ध सुरू आहे. हे वाकयुद्ध आता हात घाईवर आले असून खडसे कन्या रोहिणी यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्य केल्याने आमदारांनी विधिमंडळ अधिवेशनात याच प्रश्नी सरकारचे लक्ष्य वेधलं. त्यावर मंगळवारी गृहमंत्री भाष्य करतील असे आश्वासन सभापतींनी दिले. नेमकं त्याच दिवशी रात्री रोहिणी खडसे यांच्या गादीवर हल्ला होणे हा विलक्षण योगायोग आहे अस विकास भदाणे यांना वाटत.

खान्देशातील राजकीय बातम्या कव्हर करणारे आज तकचे पत्रकार मनीष जोग सांगतात की 40 वर्षा पासून सत्ता असलेला गड हातातून गेल्याने एकनाथ खडसे विचलित झाले आहेत. चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांना पुन्हा आपलं अस्तित्त्व दाखवण्यासाठीची दोघांची ही लढाई आहे. मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र हे मागील 40 वर्षा पासुन एकनाथ खडसे यांची एकहाती सत्ता राहिली 2019 च्या निवडणुकीत भाजपाने एकनाथ खडसेंना डावलून त्यांची कंन्या रोहिणी खड़सेला टिकिट दिले,

त्यात रोहिणी खडसेंचा दारुण पराभव करुन शिवसेनेचे चंद्रकांत पाटील निवडून आलेत व खडसेंच्या एकहाती सत्तेला सुरूंग लावला कुठेतरी 40 वर्षा पासून सत्ता असलेला गड हातातून गेल्याने खडसे विचलित झाले आहेत. तसेच नुकात्याच झालेल्या जिल्हा बैंक निवडणुकी नंतर खडसे यांची कन्या रोहिणी यांची दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची संधी देखील हुकली आहे. या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीनंतर गेल्या दोन महिन्यापासुन खडसे आणि स्थानिक आमदार यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर सुरु आहेत मुक्ताईनगरात अवैद्य धंदे कोणाचे यावर खडसे परिवार चन्द्रकांत पाटलांवर आरोप लावतात तर दूसरी कड़े आमदार चन्द्रकांत पाटील सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात , खडसे परिवारा कडून जिवाला धोका असल्याच विधानसभा अध्यक्ष यांचे कड़े कैफीयत मांडताना दिसत आहेत

काल झालेल्या रोहिणी खडसे यांच्यावरील हल्यात आता रोहिणी खडसे यांनी आप बीती सांगून शिवसेनेवर थेट आरोप केल्याने भविष्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना हा संघर्ष अटळ आहे असं चित्र आहे.

Updated : 29 Dec 2021 5:22 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top