Home > Politics > अण्णा हजारे कुठे आहेत; घोटाळ्यांबद्दल का बोलत नाहीत? - संजय राऊत...

अण्णा हजारे कुठे आहेत; घोटाळ्यांबद्दल का बोलत नाहीत? - संजय राऊत...

अण्णा हजारे कुठे आहेत; घोटाळ्यांबद्दल का बोलत नाहीत? - संजय राऊत...
X

विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांनी भूखंड घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे याविषयी काहीच का बोलत नाहीत, असा प्रश्न ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.

विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर आरोप केलेल्या या कथित भूखंड घोटाळ्याची सगळी कागदपत्रे केंद्र सरकारकडे दिली आहेत, असेही खासदार राऊत यांनी माध्यमांना सांगितले. याआधी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असतांना भ्रष्टाचाराविरोधात आंदोलने केली होती. मात्र, आता अण्णा हजारे मुख्यमंत्री शिंदे यांच्या भूखंड घोटाळ्याबद्दल शांत का आहेत, असा थेट सवालच खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

लोकपाल बिल मंजूर करण्यासाठी अण्णा हजारेंनी दिल्लीत आंदोलने केले होती. त्यामुळे अण्णा हजारे यांच्याकडून लोकांना खुप अपेक्षा होत्या. मुख्यमंत्र्यांच्या घोटाळ्याची गुप्त चौकशी व्हावी, अशी अट लोकपाल बिलात मंजूर करावी अशी त्यांची प्रामुख्याने मागणी होती. आम्ही म्हणतो गुप्तपणे का उघडपणे का नाही, असा राऊत यांनी सवाल उपस्थित केला. लोकपाल बिल जेव्हा मंजूर होईल तेव्हा होईल परंतू मुख्यमंत्र्यांच्या चौकशी नंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असेही राऊत यावेळी म्हणाले.

Updated : 24 Dec 2022 2:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top