Home > Politics > 50 खोके कुणाचं नाव आहे का? राम मुंगासे यांच्या अटकेवरून जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

50 खोके कुणाचं नाव आहे का? राम मुंगासे यांच्या अटकेवरून जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

छत्रपती संभाजीनगरमधील राम मुंगासे नावाच्या युवकाने गायलेल्या गाण्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी 50 खोके कुणाचं नाव आहे का? असा सवाल केला आहे.

50 खोके कुणाचं नाव आहे का? राम मुंगासे यांच्या अटकेवरून जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
X

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील राम मुंगासे (Singer Ram Mungase) या नवोदित कलाकाराने म्हटलेल्या गाण्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी त्याला त्याच्या घरातून अटक केली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट (Jitendra Awhad Tweet) करून सरकारला सवाल केला आहे.

जितेंद्र आव्हाड ट्वीट करून म्हटले आहेत की, राम मुंगासे या नवोदित कलाकाराने एक गाणं म्हटलं म्हणून त्याच्या घरातून संभाजीनगर पोलीसांनी त्याला अटक केली व ते त्याला अंबरनाथ पोलीसांच्या हाती देतील. पण, त्याचा गुन्हा काय ? त्याने तर कोणाचे नाव देखील घेतले नव्हते. 50 खोके हे कोणाचे नाव आहे का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. तसेच 50 खोके कुणाचं नाव आहे हे आधी पोलीसांनी स्पष्ट करावं. 50 खोके म्हटल्याने जातीय तणाव किंवा धार्मिक तणाव निर्माण कसा होतो? हे पोलिसांनी सिद्ध करावं. म्हणजे संविधान पायदळी तुडवण्याचाच निर्णय झाला आहे असे दिसतंय, असंही आव्हाड म्हणाले. या ट्वीटमध्ये आव्हाड पुढे असंही म्हणाले आहेत की, आम्ही सगळे राम मुंगासे याच्या पाठिशी आहोत. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठिशी उभा राहील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा गोठू शकत नाही. हे पोलिसी राज नाही, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी राम मुंगासे यांच्या अटकेवरून सरकारवर टीका केली आहे.

Updated : 6 April 2023 3:49 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top