Home > Politics > महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री का मिळाली नाही? जबाबदार कोण?

महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री का मिळाली नाही? जबाबदार कोण?

महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री का मिळाली नाही? जबाबदार कोण?
X

कोण होणार महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री? सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, यशोमती ठाकूर की अजून कोणी... खरंच महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार का असा सवाल आम्ही आत्ता उपस्थित करण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देण्यासंदर्भात केलेले सुतोवाच...

तसं तर आपल्या बातम्या नेहमीच्या ठरल्या आहेत एक म्हणजे महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार आणि दुसरी म्हणजे अमेरिकेला पहिली महिला राष्ट्राध्यक्ष मिळणार... होय अमेरिकेसारख्या प्रगत राज्यात देखील अद्यापपर्यंत महिला राष्ट्राध्यक्ष झालेली नाही. कधी कधी तर महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आणि जगात बलाढ्य राष्ट्र म्हणून ओळख असलेल्या अमेरिकेला अद्यापर्यंत महिला राष्ट्रपती मिळाली नाही. याचंच आश्चर्य वाटतं मात्र, हे सत्य आहे.

आणि या कटू सत्यावरच आज आपण चर्चा करणार आहोत... तसं जर पुरोगामी महाराष्ट्राने देशाला पहिली महिला राष्ट्रपती दिली. मात्र, गेल्या 60 वर्षांत महाराष्ट्राला एकही महिला मुख्यमंत्री मिळाली नाही. आता महिला मुख्यमंत्री तर सोडा सध्या महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नाही. सातत्याने या संदर्भात चर्चा होत असतात. काल परवा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात भाष्य केलं. त्यामुळं पुन्हा एकदा या चर्चेला उधान आलं आहे. मात्र, महाराष्ट्रात एकही महिला मुख्यमंत्री का झाली नाही? हा खरा सवाल आहे?

खरं तर सध्या महाराष्ट्रात ज्या राजकीय महिलांची मुख्यमंत्री पदाच्या दावेदार म्हणून आपण नाव घेतो. त्यामध्ये कोण कोणत्या महिला आहेत? पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड या सर्व महिला नेत्या राजकीय वारसाने राजकारणात आल्या आहेत. भलेही त्यांनी स्वत:चं स्वकर्तृत्व सिद्ध केलं असेल... तरीही परिवाराच्या छत्रछायेच्या बाहेर जाऊन पुरुषी राजकारण्यांप्रमाणे स्वत:चं एक विश्व निर्माण करणं, पूर्ण महाराष्ट्राचे सातत्याने दौरे करणं या साराख्या कृती महिला राजकारण्यांकडून होताना आपल्याला पाहायला मिळत नाही.

यातील आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे... महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांची पुरूषी प्रतिमा...

महाराष्ट्रातील जनतेसमोर आत्तापर्यंत मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या जनतेसमोर पुरुषी मुख्यमंत्र्यांची प्रतिमा तयार झाली आहे. मतदान करतानाही आत्तापर्यंत पुरूष व्यक्तीचं मुख्यमंत्री पदाचे चेहरे राहिले आहेत. किंबहुना मतदारांच्या पुरूषी मानसिकतेचा विचार करून आणि राजकीय पक्षातील पुरूष पुढाऱ्यांची संख्या पाहता कोणताही राजकीय पक्ष निवडणूकीत महिला राजकारण्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा करत नाही...

थोडक्यात सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा केला तर अजित दादांना राग येईल. किंवा कॉंग्रेसमध्ये यशोमती ठाकूर यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून समोर आणलं तर कॉंग्रेसच्या बाकी पुढाऱ्यांना राग येईल. असा विचार करून राजकीय पक्ष कोणत्याही महिलेचा विचार करत नाही. असं ढोबळपणे आपल्याला पाहायला मिळतं.


मात्र, या संदर्भात वर्षानुवर्षे महाराष्ट्राचं राजकारण जवळून पाहणाऱ्या राजकीय विश्लेषकांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आम्ही जेष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्याशी चर्चा केली ते म्हणतात...



"महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदी महिला विराजमान व्हावी अशी इच्छा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे आणि या सूचनेचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे असे मला वाटते साठ वर्ष फोन केली महाराष्ट्राच्या स्थापनेला परंतु महिलेचे मुख्यमंत्रीपदी निवड झालेली नाही एकेकाळी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या विरोधी पक्षनेत्या म्हणून होत्या आणि त्यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी घेतला जात होतं परंतु त्या मुख्यमंत्री झाल्या नाहीत तामिळनाडू असेल किंवा ओरिसाच्या माजी मुख्यमंत्री नंदिनी सत्पथी असतील जय ललिता मायावती पंजाब सारखा राज्यांमध्ये देखील महिला मुख्यमंत्री झाल्या आहे ज्या ठिकाणचे मानसिकता ही थोडी जुनाट पद्धतीचे आहे परंतु शाहू फुले आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात मात्र महिला मुख्यमंत्रीपदी आत्तापर्यंत होऊ नये ही खरंतर खेताची बाब आहे महिलेची खरंतर मुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर राज्याचं अमुलाग्र परिवर्तन होईल अशी भाबडी अशा बालकण्याचं कारण नाही परंतु पुरुषाची मुख्यमंत्रीपदी म्हणून निवड झाली तर ते सहाजिकच मानलं जातं तर महिन्याची मुख्यमंत्री म्हणून निवड होण्यासाठी काय हरकत आहे सर्व दोषांसह पुरुष मुख्यमंत्री चालतो तर महिला का महिला मुख्यमंत्री का का असू नये आणि विशेषता आधुनिक विचारांचा वारसा असलेला सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रामध्ये किंवा अहिल्याबाई होळकर यांचा देखील वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जिजाऊ माता यांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रामध्ये महिला मुख्यमंत्री झाली तर तमाम लोकांना होईल "


हेमंत देसाई यांच्या बरोबरच आम्ही महाराष्ट्रामध्ये महिलांचं स्वतंत्र्य डिजीटल माध्यमं चालवणाऱ्या मॅक्सवूमनच्या संपादत प्रियदर्शिनी हिंगे यांचं देखील मत जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला... "कुठल्याही राजकीय पक्षाला लोकांना अपील होईल अशी एखादी घोषणा करावी लागते. अगदी त्याचप्रमाणे शिवसेनेने महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री होतील अशी एक घोषणा केली. खरंतर महिलांचं राजकारणामधील आरक्षण असेल किंवा त्यांना जागा वाटप असेल याबाबत विविध पक्षांच्या विविध घोषणा आपण नेहमी आपण ऐकत असतो. पक्षांकडून घोषणा केल्या जातात मात्र कृती करताना नेहमी विरोधाभास दिसतो.



एकीकडे आरक्षणाबाबत बोललं जातं मात्र दुसरीकडे उमेदवारी देताना मात्र नेहमी ते मागे पडतात. भाजपमध्ये आपल्याला अनेक महिला आमदार असल्याचे दिसून येतं पण यातील काही ठराविकच महिला आमदार समोर येऊन बोलताना दिसतात.आता शिवसेनेने महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळतील अशी घोषणा केली आहे. पण आत्तापर्यंतचा इतिहास पहिला तर सर्व पक्षांमध्ये बोलले जाते एक मात्र त्यांच्या कृतीतून नेहमीच विरोधाभास दिसतो. महिलांचे विषय नेहमीच निवडणुकांच्या अजेंड्यावर येतात मात्र ते कृतीत उतरताना दिसत नाहीत. पण शिवसेनेनं जी भूमिका घेतली आहे ती त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं लागेल. कारण याआधी कोणीही असा विचार केला नव्हता पण शिवसेना आता असा विचार करते आहे. हे सगळं असलं तरी शिवसेना सुद्धा अजूनही महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री देऊ शकेल का यावर मात्र अद्यापही प्रश्नचिन्ह आहे.." अस मत त्यांनी व्यक्त केलं आहे.



प्रियदर्शिनी हिंगे यांच्याशी बोलल्या नंतर आम्ही वर्षानुवर्ष राजकीय महिला पत्रकार म्हणून महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या रश्मी पुराणिक यांच्याशी बातचीत केली. "महाराष्ट्राला अजूनही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही पुरोकामी महाराष्ट्र आपण म्हटला जातो हे खरंच एक शोकातिंका आहे राज्याची खर तर स्थानिक स्वराज्य संस्थामधील महिलांना आरक्षण आहे. सरपंच महिला झाल्या असल्या तरी मुख्यमंत्री महिला होऊ शकलेली नाही . महाराष्ट्रात देखील महिलांना पद दिलं जातं किंवा मंत्री पद दिलं जातं तेव्हा महिला आणि बालकल्याण हेच पद दिलं जातं या पलिकडे खुप कमी वेळा महिलांचा विचार केला जातो.



जर आपण महाविकास आघाडीमध्ये पाहिलं तर शिक्षण मंत्री म्हणून एका महिलेला संधी मिळाली होती. परंतू खुप कमी वेळा महिलांना महत्त्वाची खाती आगदी महसूल खातं असेल किंवा गृह खातं असेल अशी महत्त्वाची खाती दिली जात नाहीत. त्यामुळे आपण बघतो की महिला एकतर राजकारणात म्हणजे आमदार महिला जरी वाढल्या तरी विधी मंडळात किती प्रश्न विचारू शकतात. त्यांना त्याच्या पक्षा कडून कितीवेळा संधी दिली जाते. आणि जेव्हा सरकार स्थापन होतं तेव्हा खरचं महिलांना त्यांच्या संबंधीतच खाती दिली जातात. आता पर्यंतचा ट्रेंड आहे आणि आपण बघतलं आणि म्हणनच महिलांना मुळ एखादी मोठी जबाबदारी देण्यात हेच पक्ष आकडता घेताना दिसत असल्याचे चित्र दिसतं आहे." त्या म्हणाल्या...



Updated : 2 Dec 2022 8:09 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top