Home > Politics > सुप्रीम कोर्टाच्या पाच जणांच्या खंडपीठात सहावं कोण?

सुप्रीम कोर्टाच्या पाच जणांच्या खंडपीठात सहावं कोण?

आठवड्याभराच्या खंडानंतर सुप्रिम कोर्टात पाच न्यायमुर्तींच्या खंडपीठापुढे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु झाली. सुप्रिम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर प्रतिवाद सुरु झाल्यानंतर पाच न्यायमुर्तीबरोबर सहावे न्यायमुर्ती दिसल्यानं सर्वांचाच जीव भांड्यात पडला होता. पण मुख्य न्यायमुर्ती धनंजय चंद्रचुड या पाहुण्या न्यायमुर्तीची ओळख करुन दिल्यानंतर सगळ्याच्या उत्सुकतेचे समाधान झाले

सुप्रीम कोर्टाच्या पाच जणांच्या खंडपीठात सहावं कोण?
X

भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (D.Y Chandrachud) यांनी तिचे आणि केनियाच्या सर्वोच्च न्यायालयातील शिष्टमंडळाचे स्वागत करत केनियाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मार्था कूम आमच्यामध्ये आल्याचा आम्हाला खूप सन्मान वाटतो, असे सांगितले. चंद्रचुड म्हणाले की, न्यायाधीशांनी सुनावणीपूर्वी केनियाच्या सरन्यायाधीशांना सध्या सुरू असलेल्या शिवसेना (Shiv Sena) प्रकरणाची माहिती दिली. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) आणि महेश जेठमलानी (Mahesh Jethmal) यांनीही बारच्या वतीने केनियाच्या सरन्यायाधीशांचे स्वागत केले. बरोबर भारताचे अनेक शतकांपासुनचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, असं राष्ट्रपती या शिष्टमंडळाचं स्वागत करताना म्हणाल्या. केनियाच्या विकासात भागिदार असल्याचा भारताला सार्थ अभिमान आहे.

केनियामध्ये (Kenya) आलेल्या नवीन सरकारसोबत उच्चस्तरीय राजकीय संबंध वृद्धींगत करण्याची परंपरा कायम ठेवायला भारत उत्सुक आहे. द्विपक्षीय व्यापार संबंध अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र काम केले पाहिजे, असं राष्टपती म्हणाल्या. केनियाच्या मुख्य न्यायाधीश मार्था के. कूम (Martha K. Coom) मंगळवारी दुपारी सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या खंडपीठात घटनापीठाच्या सुनावणीसाठी उपस्थित होते.

न्यायमूर्ती कूमे केनियाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आहेत. शिवसेनेतील गटबाजीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठात आजही सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठात न्यायमूर्ती एमआर शाह (MR SHAH), कृष्णा मुरारी (Krishna Murari), हिमा कोहली (Hima Kohli) आणि पीएस नरसिम्हा (PS Narasimha) हे बेंचचे इतर सदस्य आहेत. केनियामध्ये सर्वांसाठी न्याय सुलभ करण्यासाठी आणि महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु (Draupadi Murmu) यांनी यापूर्वी प्रशंसा केली.

Updated : 14 March 2023 4:03 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top