Home > Politics > मंत्रालयातील बोगस नोकरभरती प्रकरणाची चौकशी करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.

मंत्रालयातील बोगस नोकरभरती प्रकरणाची चौकशी करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.

मंत्रालयात बोगस नोकरभरती केली जाते. त्यामुळे कुणाच्या वरदहस्तामुळे रॅकेट चालवलं जातंय. असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मंत्रालयातील बोगस नोकरभरती प्रकरणाची चौकशी करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.
X

मंत्रालयात गेल्या अनेक वर्षांपासून लिपिक पदाची भरती केली जातं असल्याची माहिती समोर आली आहे. परंतू ही भरती शासनाच्या नियमांनुसार होतं नसल्याची गंभीर बाब समोर आली. १२ बेरोजगार तरुणांची मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागात मुलाखत घेण्यात आल्यानंतर, या तरुणांना जे जे रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यासाठी पाठवण्यात आले होते. विशेष म्हणजे या तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ७४ लाख उकळण्यात आले.

त्यामुळे या तरुणांना कुणी फसवलं यासंदर्भात चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. परंतू याबाबत चौकशी त्वरित करावी अशी घोषणा देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतं केले जातं आहेत. मंत्रालयातील बोगस नोकरभरती प्रकरणी मंत्रालयातील कोणत्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे? मुलाखती दरम्यान तरुणांना कोणते ओळखपत्र देण्यात आले होते? तसेच संबंधीत तरुणांनी कागदपत्र कुणाकडे सादर केले होते.? कुणाच्या वरदहस्तामुळे हे रॅकेट सुरु केले आहे. असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

Updated : 30 Dec 2022 3:48 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top