Home > Politics > #WestBengal मुख्यमंत्री-राज्यपाल संघर्ष शिगेला: ममता बॅनर्जी होणार कुलपती

#WestBengal मुख्यमंत्री-राज्यपाल संघर्ष शिगेला: ममता बॅनर्जी होणार कुलपती

#WestBengal  मुख्यमंत्री-राज्यपाल संघर्ष शिगेला: ममता बॅनर्जी होणार कुलपती
X

केंद्र सरकार आणि बिगर भाजपशासित राज्यांमध्ये संघर्ष आता शिगेला पोहोचला असून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकार आणि राज्यपाल जगदीप धनखर यांच्या संघर्षात राज्यशासित विद्यापीठाचे कुलपती हे राज्यपाल नसून मुख्यमंत्री असतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीचे विधेयक लवकरच विधानसभेत मांडण्यात येणार आहे.

पश्चिम बंगालचे शिक्षण मंत्री ब्रात्य बसू यांनी बैठकीनंतर सांगितले की, "मुख्यमंत्र्यांना सरकारी विद्यापीठांचे कुलपती बनवण्याच्या विधेयकाला बंगाल मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आतापर्यंत राज्यपाल हे राज्य विद्यापीठाचे कुलपती होते.'' दरम्यान, बंगालमधील राज्यपाल कार्यालय आणि ममता सरकारमधील वाद अनेकदा चर्चेत राहिले आहेत. राज्यपाल जगदीप धनखर हे सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर राज्य सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

महाराष्ट्रातही यापूर्वी राज्यपालांचे अधिकार कमी करून राज्य सरकारने विद्यापीठांच्या नियुक्त्यांमध्ये राज्य सरकारचे महत्त्व वाढवण्याचा कायद्याला मंजुरी दिली होती. देशातील प्रत्येक बिगर भाजपशासित राज्यांमध्ये राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष सुरू असून त्याला केंद्रसरकार खतपाणी घालत असल्याचा आरोप होत आहे.

Updated : 26 May 2022 5:52 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top