जितेंद्र आव्हाड यांच्या भाषणाचा हेतू समजून घेणे गरजेचे आहे: अनिल वैद्य
X
जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी बाबत चुकीचे वक्त्यव्य केले असे काही लोक म्हणून त्यांना टार्गेट करीत आहेत .ते जे काही बोलले तो त्यांचा भाषण स्वातंत्र्य हा मूलभूत हक्क आहे. तो संविधानाच्या कलम 19 ने त्यांना दिला आहे.सत्य हे कडूऔषध असते डॉक्टर आजार दूर करण्यासाठी ते देत असतो रुग्णांना फार राग येतो पण डॉक्टरचा हेतू रुग्णांना दुरुस्त करणे हाच असतो, माजी न्यायमूर्ती अनिल वैद्य यांनी केलेला लेखन-प्रपंच..
आव्हाड म्हणाले ,'ओबीसींना हे माहिती नाही की, चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला पणजोबाला देवळात सुद्धा येऊ द्यायचे नाहीत. हे सगळे विसरलेत. आता आरक्षणाच्या निमित्ताने का असेना पुढे येतायत. पण नुसतं घरात बसून व्हॉट्सअप करुन चालणार नाही, रस्त्यावर यावं लागेल," असं आव्हाड म्हणाले आहेत.(संदर्भ :-लोकसत्ता)
यात काय चूक आहे? जितेंद्र आव्हाड असेही म्हणाले की मंडल अयोग ओबीसी साठी होता पण त्या साठी दलित लढले . इत्यादी वक्त्यव्य सन्मानीय जितेंद्र आव्हाड यांनी केले ते खरे की खोटे ?यावर मी काही लिहणार नाही कारण वस्तुस्थिती सर्व जुन्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना माहिती आहे.मला आठवते की,
कांशीरामजिच्या नेतृत्वाखाली जेव्हा मंडळ अयोगासाठी धरणे धरायचे तेव्हा आंबेडकरी कार्यकर्ते कांशीराम यांना विचारायचे की,"ओबीसी के मंडल आयोगसे आपना क्या फायदा?" तेव्हा कांशीराम म्हणायचे ,"हम भी लेनेवाले और ओ भी लेने वाले तो भाईचारा निर्माण होगा" इतके मात्र मला आठवते.
एकंदरीत सन्मानीय जितेंद्र आव्हाड जे बोलले ते ओबीसींना जागृत करण्यासाठी बोलले.त्यांच्या बोलण्याचा उद्देश वाईट नाही की कुणाला दोष देणे हा सुद्धा दिसत नाही.त्यांनी आईच्या भूमिकेतून संताप व्यक्त केला पण त्यांना समजून न घेता त्यांचा निषेध केला जात आहे.याचा खेद होतो.तसेच ओबीसी आरक्षणा साठी तत्कालीन ओबीसी नेते लालूप्रसाद यादव,शरद यादव,कर्पूरी ठाकूर मुलायम सिंग इत्यादी महाराष्ट्र बाहेर नेते तर महाराष्ट्रात नागेशभाऊ चौधरी,जनार्धन पाटील ,छगन भुजबळ ,ढोबळे ,आणि स्वतः जितेंद्र आव्हाड इत्यादी ओबीसी नेत्यांनी
कार्य केले आहे. डॉ बाबासाहेबआंबेडकरांनी संविधानात कलम 340 नमूद करून ओबीसी साठी आयोग अर्थात आरक्षणाची तरतूद केली.नेहरू सरकार आयोग स्थापन करून ओबीसीचा शोध घेत नाही म्हणून राजीनामा ही दिला .हेच सन्मानीय जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले .कधी कधी जिव्हाळ्याच्या माणसालाही कान धरून सरळ करावे लागते तसाच प्रयत्न जितेंद्र आव्हाडांनी केला .पण त्याला किती अदरवाईज घेतले !
बाप रे! बाप!