Home > Politics > 2024 मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीच ? ; अमित शहांच्या एका विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

2024 मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीच ? ; अमित शहांच्या एका विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

2024 मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीच ? ; अमित शहांच्या एका विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ
X

लखनऊ : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी सपा, बसपासारख्या पक्षांकडून मतदारांना वेगवेगळी आश्वासनं दिली जात आहेत. तर भाजपच्या बड्या नेत्यांनी उत्तर प्रदेशचे दौरे करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील उत्तर प्रदेशच्या जनतेला काल संबोधित केले. यावेळी शहा यांनी 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी 2022 मध्ये योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकदा बसवा, असे जनतेला आवाहन केले. त्यांचे हे वक्तव्य साधे सरळ आणि सोपे वाटत असले तरी त्यातून अनेक अर्थ काढले जात आहेत.

लोकसभेच्या दोन्ही निवडणुकीत भाजपकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी हेच नाव होतं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना कोणी विरोध देखील केला नाही. त्यांची लोकप्रियता तसेच जनतेच्या मनात त्यांचे असलेले स्थानामुळे हे घडल असावं. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार कोण असेल यावर चर्चा रंगू लागली आहे. यामध्ये मोदी यांना पर्याय म्हणून अमित शहा यांच्याकडे पाहिले जात आहे. असे असताना देखील शाह यांनी आज उत्तर प्रदेशमध्ये 2024 ला मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी 2022 ला योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनवा असं विधान केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत देखील मोदीच पंतप्रधानपदाचे दावेदार असतील हे शाह यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलंय का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

एखाद्या पक्षाला केंद्रात सत्ता स्थापन करायची असेल तर उत्तर प्रदेश हे राज्य ताब्यात असायला हवे असं राजकीय विश्लेषक सांगतात. कारण एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 16 टक्के जनता एकट्या उत्तर प्रदेशात राहते,या राज्यातील जनतेचा कौल हा लोकसभा निवडणुकीची दिशा ठरवणारा असतो. सोबतच या राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल केंद्रातील सत्तेची दारं उघडतात असं देखील म्हटले जाते. यामुळे उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आहे. कदाचित याच कारणामुळे एका दगडात दोन पक्षी मारण्यासाठी अमित शाह यांना योगी आदित्यताथ यांना मुख्यमंत्री आणि नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान बनवावं असं विधान केलं असावं.

Updated : 30 Oct 2021 7:56 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top