Home > Politics > विनायक मेटे यांच्या निधनामुळे मराठा समाजाचं अपरिमित नुकसान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विनायक मेटे यांच्या निधनामुळे मराठा समाजाचं अपरिमित नुकसान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि मराठा समाजाचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मेटे यांना दाखल करण्यात आलेल्या नवी मुंबईतील एमजेएम रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 14 Aug 2022 12:16 PM IST
X
X
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्य निधनावर प्रतिक्रीया व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा समाजासाठी झटणारा नेता हरवला. त्यामुळे मराठा समाजासाठी सभागृहातील, कायदेशीर आणि रस्त्यावरील लढाई लढणाऱ्या नेत्याला मराठा समाज मुकला. त्यामुळे मराठा समाजाचे अपरिमित नुकसान झाले आहे. तसंच विनायक मेटे यांच्या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
आम्ही मेटे यांच्या कुटूंबियांच्या सोबत आहोत, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Updated : 14 Aug 2022 12:16 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire