आप आता धर्मनिरपेक्ष पक्ष नाही, प्रकाश आंबेडकरांची टीका
X
दिल्लीतील केजरीवाल सरकारचे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. एका धर्मांतरण कार्यक्रमात कथितरीत्या हिंदू देवी देवतांचा अपमान झाल्याचां दावा भाजपने आंदोलन केलं. ज्यामध्ये मंत्री राजेंद्र पाल गौतम उपस्थित होते. केजरीवाल हे कोणत्याही प्रकारे अडतणीत येऊ नयेत म्हणुन स्वतःहुन राजीनामा दिला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या कृतीनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आप वर टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकर य़ांनी "आंबेडकर कुटूंब राजेंद्र पाल गौतम यांचं समर्थन करत आहे. तसेच बौद्ध धर्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या मार्गाचे अनुकरण करून पूर्वीच्या अस्पृश्यांचा सन्मान पुनर्संचयित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये सर्व आंबेडकरी जनतेने सामील व्हावे असे आवाहन करतो.
आम आदमी पक्ष आता धर्मनिरपेक्ष किंवा धार्मिक सहिष्णुतेचा समर्थक नाही, तर वैदिक हिंदू धर्माचा समर्थक आणि बौद्ध धर्म, संत धर्माचा विरोधक आहे." अशा कठोर शब्दांत टीका केली आहे.
@AamAadmiParty आम आदमी पार्टी अब धर्मनिरपेक्ष या धार्मिक सहिष्णुता का समर्थक नहीं है, बल्कि वो वैदिक हिंदू धर्म के समर्थक और बौद्ध धम्म, संत धर्म के विरोधी हैं।#RajendraPal #AAP
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) October 10, 2022