दंगल पेटवणारे उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय ब्राह्मण : सुजात आंबेडकर
X
दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकरांचे (Prakash ambedkar) पुत्र सुजात आंबेडकर यांनी केलं आहे.औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयात एका कार्यक्रमात सुजात आंबेडकर (Sujat ambedkar)यांनी हजेरी लावली होती. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं.
राज ठाकरे (Raj Thackrey)यांनी मशिदींवरील भोंग्या संबंधी विधान केल्यानंतर सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरे यांना आधी अमित ठाकरेंना (amit Thackrey) हनुमान चालिसा बोलायला लावा असं आव्हान दिलं होतं. यासंबंधी विचारलं असता मी अमित ठाकरेंना तुम्ही हनुमान चालिसा म्हणा असं काही वैयक्तिक निमंत्रण नव्हतं.ती एक बोलण्याची पद्धत असते.आतापर्यंत आपण कितीही दंगली बघितल्या ती बाबरी मस्जिदची दंगल असो,भीमा कोरेगावची दंगल असो.आपण हेच बघितलं की दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय आणि उच्च ब्राम्हण असतात.त्यांच्या वक्तव्यानंतर दंगलीत उतरतात प्रत्यक्षात ती बहुजन मुलं असतात.
माझं राज ठाकरेंना एवढंच म्हणणं होते की, तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल तर बहुजन मुलांच्या आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवा. जर तुम्ही स्वत:च्या मुलाला उतरवणार नसाल तर मग दुसऱ्यांच्याही उतरवू नका, असं सुजात आंबेडकर यांनी सांगितलं.
अनेक लोकांना माझं म्हणणं पटलं असल्याचं सुजात आंबेडकर यांनी सांगितलं. तसंच ते म्हणाले की, लोकांनी बोलण्यापेक्षा मनसेमधील अनेक पदाधिकारी, मुस्लिम बांधवांनी राजीनामा देत पक्ष सोडला आहे.
कोरोना काळात सर्व आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली होती, त्यावर कुणीही बोलत नाही. असं असतानाही जर भाजपा किंवा राज ठाकरे असेच हिंदू-मुस्लिम दंगलीवर बोलत असतील तर येथील लोकांना भावनिक धर्माच्या प्रश्नांमध्ये अडकून ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचा सरळसरळ अर्थ होतो, अशी टीका सुजात आंबेडकर यांनी केली.