Home > Politics > वरुण गांधी कॉंग्रेसमध्ये जाणार की तृणमूल कॉंग्रेसमध्ये? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

वरुण गांधी कॉंग्रेसमध्ये जाणार की तृणमूल कॉंग्रेसमध्ये? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

वरुण गांधी कॉंग्रेसमध्ये जाणार की तृणमूल कॉंग्रेसमध्ये? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
X

भाजप खासदार वरुण गांधी सध्या स्वपक्षाला खडे बोल सुनावत असल्यानं चांगलेच चर्चेत आहे. तीन कृषी कायदे, लखीमपूर खेरी येथील घटना आणि कंगना रणौत च्या 'भीक मे मिली आझादी' या वक्तव्यावर वरुण गांधी यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे. त्यामुळं ते भाजपला राम राम करणार असल्याची शक्यता आहे. मात्र, वरुण गांधी भाजपला राम राम करुन कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार की ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ममता बॅनर्जी सध्या तृणमूल कॉंग्रेसच्या राजकीय विस्तारात व्यस्त आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी काँग्रेसच्या अनेक बडे नेत्यांना पक्षात स्थान दिलं आहे. त्यामुळे आता त्या वरुण गांधींना आपल्या पक्षात घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

काँग्रेसमधून तृणमूल काँग्रेसमध्ये जाणाऱ्या अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे. त्यामध्ये सुष्मिता देव, राजेशपती, ललितेशपती त्रिपाठी आणि लुइझिन्हो फालेरो यांचा समावेश आहे.

गोव्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीकोनातून भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने कॉंग्रेस नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईसिन फालेरो यांना 29 सप्टेंबरला तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश दिला आहे. तृणमूल कॉंग्रेसने त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी देखील वरुण गांधी यांनी भाजप आणि मोदी सरकार विरोधात ज्या प्रकारचे ट्विट केले आहेत. त्या ट्वीट चा विचार केला असता, ते काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा यासाठी प्रयत्न करत असल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापपर्यंत असं काही घडल्याचं दिसून येत नाही.

ममता बॅनर्जी पुढील आठवड्यात दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान वरुण गांधी त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळं वरुण गांधी तृणमूल कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Updated : 20 Nov 2021 5:52 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top