भाजपच्या नेत्यांनी थोबाडात मारली, बॉम्बही आणले, पोलिस अधिकाऱ्याचा 'तो' संतापजनक व्हिडीओ व्हायरल
भाजपच्या नेत्यांनी थोबाडात मारली, बॉम्बही आणले, पोलिस अधिकाऱ्याचा ‘तो’ संतापजनक व्हिडीओ व्हायरल UP SP Prashant Kumar City Etawah Gets Slapped, Caught On Camera Saying BJP Wale Bomb Lekar Aaye The
X
उत्तर प्रदेश मध्ये कायद्याचं राज्य आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. उत्तर प्रदेशमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपकडून हिंसाचार करण्यात आल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या हिंसाचारावरून योगी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहेत. एका फोटोमध्ये महिलेची भर रस्त्यात साडी ओढली जात आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या नवीन डीजीपी वर सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोबतच या हिंसाचार वरुन डीजीपीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असताना आता पोलिसांना मारहाण केल्याचं स्वत: पोलिस सांगत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
उत्तर प्रदेशमधील इटावा मध्ये पोलिसांच्या कानशिलात लगावल्याचं समोर आलं आहे. या संदर्भात एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पोलिस अधिकारी हात जोडून तुमच्या लोकांनीच आम्हाला मारलं असं स्थानिक आमदार आणि जिल्हाध्यक्षांना सांगत आहेत.
दरम्यान पोलिसांना मारहाण झाल्याचं समजताच पोलीस अधिक्षक प्रशांत कुमार घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्यांच्याच कानशिलात लगावल्याचं ते या व्हिडीओमध्ये सांगत आहे.
योगी जी का नारा था ठोंक दो,
— Manish Jagan Agrawal (मनीष जगन अग्रवाल) (@manishjagan) July 10, 2021
आज भाजपाइयों ने पुलिस को तबियत से ठोंका!
इटावा में भाजपा विधायक और जिलाध्यक्ष की मौजूदगी में भाजपा नेताओं ने एसपी सिटी को थप्पड़ मारा, पत्थरबाजी की,
पुलिस पिट रही है, सत्ताधारी गुंडों के आगे हाथ जोड़ रही है,
ये जंगलराज की परिभाषा नहीं तो और क्या है? pic.twitter.com/3j3TScSMR9
या व्हिडीओमध्ये प्रशांत कुमार फोनवर बोलत आहे.
"हे लोक विटा आणि दगडफेक करत आहेत. त्यांनी मला थोबाडीतही मारली. त्यांनी त्यांच्यासोबत बॉम्बही आणले आहेत. हे लोक भाजपाचे कार्यकर्ते आहेत. यात भाजपा आमदार आणि भाजपा जिल्हाध्यक्षाचाही समावेश आहे"
असं हे अधिकारी सांगत आहेत.
दरम्यान राज्याचे नवीन डीजीपी मुकुल गोयल यांनी या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यांनंतर लगेचच एका ज्वेलर्स द्वारे देण्यात आलेल्या वृत्तपत्रातील फुल पेज जाहिरातीमुळे डीजीपी जोरदार चर्चेत आले होते. मात्र, डीजीपी मुकुल गोयल हे आता त्यापेक्षा अधिक चर्चेचा विषय झाले आहेत. एवढंच नाही तर योगी आदित्यनाथ यांच्यानंतर ते दुसऱ्या क्रमांकावर ट्विटरवर ट्रेंड होते.
#यूपी में ब्लॉक प्रमुख के चुनाव में हिंसा हुई, मारपीट हुई, पत्थर चले और गोलियाँ भी .. लखीमपुर में महिला के साथ अभद्रता की तस्वीरें सबने देखीं.. मीडिया के चार साथी भी घायल हुए
— पंकज झा (@pankajjha_) July 8, 2021
उत्तर प्रदेशमधील सीतापूर, कन्नौज, लखीमपूर, महाराजगंज, फतेहपूर, कानपूर नगर, कानपूर देहात, इटावा सोबतच इतर जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांनतर एका साधूच्या राज्यात लोकशाही वर घाला घातला जात असल्याच्या भावना लोकांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत..
पंचायत समितीच्या निवडणुकीतील नामांकनासाठी राज्यातील काही जिल्ह्यामध्ये झालेल्या या हिंसाचारात लाठ्या, गोळ्या, बॉम्बचा वापर करण्यात आल्याचं काही व्हिडीओमधून दिसत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांचे कपडे फाडण्यात आले, एवढंच नाही तर महिलांना देखील त्रास देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय.
दरम्यान सत्ताधारी भाजपचे वर्चस्व असल्याने, काही जिल्ह्यात विरोधी पक्षातील लोकांना उमेदवारीच दाखल करु दिली नसल्याचं वृत्त जन ज्वार ने दिले आहे. या हिंसाचाराच्या सुशासनाचे धिंडवडे उडाले असून पोलिस प्रशासनाने सत्ताधाऱ्यांना उघडपणे पाठिंबा दिला असल्याचं माध्यमांनी म्हटलं आहे. असा एखादाही जिल्हा नसेल तिथं हिंसाचार झाला नसावा. सत्तेसमोर प्रशासन सत्य दाबत असल्याचं चित्र सध्या उत्तर प्रदेशमध्ये पाहायला मिळत आहे.
Almost every BJP workers and leaders will be arrested if UP police do their duty honestly. pic.twitter.com/EVBWScZdFP#updgp_निकम्मा_है
— Anup MS (@AnupSinnur) July 9, 2021
पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी अर्ज दाखल करताना आणि या अगोदर झालेल्या पंचायत समितीच्या अध्यक्षांची निवडणूकीतील हिंसाचार पाहता उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचार विरोधकांनी प्रचार कसा करावा असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष दोन – दोन निवडणूक आयुक्त हे उत्तर प्रदेशमधून आहेत.
Disgusting pic.twitter.com/zlfBKdE5if
— Sahil sheikh (@SahilMa24324324) July 9, 2021
काही दिवसांपूर्वीच बंगाल निवडणुकीतील झालेला हिंसाचार व हत्याकांडावरून, तृणमूल कॉंग्रेसच्या लोकांवर आरोप केले जात होते. त्यांना टीएमसीचे गुंड सांगत निवडून आलेल्या सरकारला पाडण्याचा प्रयत्न केला जात होता. या घटनांवर नॅशनल चॅनलवर डीबेट शो सुरु होते. मात्र, घटनांचा हाच क्रम उत्तर प्रदेशमधील या निवडणुकांमध्ये पाहायला मिळत असताना आता माध्यमं नरमाईची भूमिका घेत आहेत.
उत्तर प्रदेश सध्या रामराज्य असल्याची चर्चा सुरु असते. या राम राज्यात सध्या कोणावरही लाठी, गोळ्या आणि बॉम्बचा वापर सुरु आहे. कोणत्याही महिलेचे कपडे रस्त्यावर उतरवले जात आहे. त्यामुळं उत्तर प्रदेशच्या जनतेला आता खरंच देवच वाचवू शकतो.
This is ONLY CALLED cheerharan.
— राजीव कुमार पाल (बैरागीजी) (@Rajeevkumarpal) July 9, 2021
सतयुग 👇👇 कल युग👇👇#updgp_निकम्मा_है pic.twitter.com/8kFdzLnvVu