UP ELECTION : शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज भाजपच्या दबावामुळे बाद, संजय राऊतांचा गंभीर आरोप
X
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनेही आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये शिवसेनेने काही उमेदवार दिले, पण भाजपच्या दबावामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी या उमेदवारांचे अर्ज बाद केले आहेत, असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केले आहे. उमेदवार अर्ज दाखल कऱण्यासाठी वेळ उलटून गेल्यानंतर आले होते, असे कारण निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहे. पण हे काऱण खोटे असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच याबाबत दिल्लीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले आहे. तसेच याबाबतचे पुरावे देखील असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना उत्तर प्रदेश निवडणुकीत उतरणार असल्याने भाजपमध्ये भीतीचे वातावरण आहे, त्यामुळेच भाजपने शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्याचा कट रचल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला आहे.