शिवसेना, भाजपला स्पष्ट बहुमत असताना पवार यांनी सरकार बनवलं, हा सत्तेचा दुरुपयोग नाही का ?- रावसाहेब दानवे
X
पुणे : केंद्र सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग केला जात नाही. राज्यात शिवसेना आणि भाजपला स्पष्ट बहुमत होतं तरीही सरकार बनवलं, हा दुरुपयोग नाही का? असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
केंद्र सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग करून राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांना त्रास दिला जातो, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार नेहमी करत असतात. याच वक्तव्यावर बोलताना दानवे यांनी पवार यांच्यावर टीका केली. सत्तेचा दुरुपयोग केंद्राकडून केला जात नाही. उलट राज्यात केला जातो. शिवसेना आणि भाजपला स्पष्ट बहुमत होतं. पण सरकार बनवलं हा सत्तेचा दुरुपयोग नाही का ? असा प्रश्न दानवे यांनी केला.
वाढत्या इंधन दरवाढीवर देखील दानवे यांनी भाष्य केलं आहे. केंद्र सरकारमुळे इंधन दर वाढलेले नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दाराशी त्याचा संबंध आहे. सोबतच राज्य सरकारही याला जबाबदार आहे, आंतरराष्ट्रीय दराशी जोडलेले असल्यामुळे देशात इंधनाचा दर वाढतो. मोदी सरकार अशा प्रकारे इंधनाची दरवाढ करणार नाही, असं दानवे म्हणाले.
तर काही दिवसांपूर्वी राज्यात वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोळशाची टंचाई भासत होती. त्यावेळी रावसाहेब दानवे यांनी वीजटंचाईला राज्य सरकार जबाबदार धरलं होतं. पावसाळ्यापूर्वी राज्यांनी कोळसा उचलला नसल्यामुळे कोळसा टंचाई झाली असा दावा त्यांनी केला होता. त्याचा त्यांनी पुनरुच्चार केला