घटनापीठाकडे वाद गेल्याने ४-५ वर्षे निकाल लागणार नाही- भरत गोगावले
X
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील सत्तासंघर्ष आता सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आला आहे. पण यावरील सुनावणी अद्यापही सुरू झालेली नाही. एकीकडे उद्धव ठाकरे गटातर्फे या वादावर घटनापीठाने लवकरात लवकर सुनावणी घ्यावी अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातील आमदार आणि प्रतोद भरत गोगावले यांनी मोठे विधान केले आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये शिवसेना मेळाव्यात बोलताना भरत गोगावले यांनी हे विधान केले आहे. शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटाचा वाद आता घटनापीठाकडे गेला आहे. त्यामुळे पुढची ४ ते ५ वर्ष काही निकाल लागणार नाही, तोपर्यंत पुढची निवडणूक देखील येईल, असे विधान भरत गोगावले यांनी केले आहे. एन.व्ही रमणा यांनी सरन्यायाधीश पदावरुन निवृत्त होण्याआधी हा वाद ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग केला होता. पण तसेच त्यावर २५ ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्याचेही आदेश दिले होते. पण अद्याप घटनापीठाकडे याची सुनावणी झालेली नाही.