Uddhav Thackeray : रस्ता आणि कागदावरच्या लढाईत मागे पडणार नाही
टीम मॅक्स महाराष्ट्र | 3 Aug 2022 4:40 PM IST
X
X
सत्तासंघर्षावरील कोर्टातील सुनावणीमध्ये शिवसेनेतर्फे वकिंलाना जोरदार युक्तीवाद केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टावर विश्वास असून न्याय मिळेल असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. जळगावमधील शिवसेना पदाधिका-यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली, त्यावेळी त्यांच्याशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि बंडखोरांवर जोरदार टीका केली आहे.
आतापर्यंत शिवसेना फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण आता शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राजकारणात हार जीत होत असते, पण संपवण्याची भाषा केली जात नाही, ती आता होते आहे, अशी टीका त्यांनी केली.
Updated : 3 Aug 2022 4:41 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire