Home > Politics > उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर 'रानबाजार' मधील तो सीन व्हायरल

उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर 'रानबाजार' मधील तो सीन व्हायरल

उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर रानबाजार मधील तो सीन व्हायरल
X

राजकारणात घडलेल्या घटनांचा संदर्भ विविध चित्रपट, मालिका किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या वेबसीरीजमधील दृष्यांशी जोडला जातो. त्याच प्रकारे उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर रानबाजार या वेबसीरीजमधील एक सीन व्हायरल होत आहे.

राजकारणात घडलेल्या घटनेनंतर त्याचा संदर्भ विविध चित्रपटाशी जोडला जातो. तर त्यावर लोक अनेक मीम्सच्या माध्यमातून मत व्यक्त करत असतात. त्याचप्रकारे उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर मीम्स व्हायरल होत आहेत.

राजकीय घडामोडींवर लोक विनोदी भाषेत मीम्स व्हायरल करीत असतात. त्यातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतरही अनेक विनोदी मीम्स व्हायरल होत आहेत. त्यातच उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर रानबाजार या वेबसीरीजमधील एक सीन व्हायरल होत आहे.

रानबाजार या वेबसीरीजमध्ये प्राजक्ता माळी यांचा एक सीन व्हायरल झाला आहे. त्यामध्ये प्राजक्ता माळी यांनी बोल्ड सीन दिला आहे. तर त्यांच्या बोल्ड दृष्यानंतर त्यावर जनसत्ताक वर्तमानपत्राची हेडलाईन दिसते. त्यामध्ये लिहीले आहे की, अखेर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा. तर सबहेडिंगमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपुर्व उलथापालथ असं लिहीले आहे.

रानबाजार वेबसीरीजच्या ट्रेलरमध्ये हेच दृष्य दाखवण्यात आले होते. त्यामुळे ही वेबसीरीज चर्चेचा विषय ठरली होती. तर या दृष्यावर उलट सुलट चर्चा रंगली होती. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा हा सीन आणि ट्रेलर व्हायरल होत आहे. तर त्यावर अनेकांनी मीम्सच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत.

Updated : 30 Jun 2022 12:05 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top