Home > Politics > Uddhav Thackeray : उदय सामंत, भरत गोगावले उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर?

Uddhav Thackeray : उदय सामंत, भरत गोगावले उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर?

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा होणार की नाही? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये सभा घेणार आहेत. मात्र या सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या निशाण्यावर कोण असणार? याबाबत चर्चा रंगली आहे.

Uddhav Thackeray : उदय सामंत, भरत गोगावले उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर?
X

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यातच एकीकडे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi Vajramuth) वज्रमूठ सभांचा तडाखा सुरु असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी सभा घेण्यास सुरुवात केली आहे. याआधी उद्धव ठाकरे यांनी मालेगाव (Malegaon), छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar), नागपूर(Nagpur), पाचोरा (Jalgaon Pachora) आणि मुंबईत (Mumbai) सभा घेतल्या आहेत. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे आता रायगड (Uddhav Thackeray in Raigad) जिल्ह्यातील महाडमध्ये सभा घेणार आहेत. मात्र या सभेत निशाण्यावर कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी मालेगावमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अमित शहा (Amit Shah) आणि मंत्री दादा भुसे (Dada bhuse) आणि आमदार सुहास कांदे यांच्यावर निशाणा साधला होता. छत्रपती संभाजीनगरच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी संजय शिरसाठ, अब्दुल सत्तार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांच्यावर तर नागपूरमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला होता. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. तर मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.

कोकणात उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर, भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, योगेश कदम हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्यातच रायगडमध्ये होणारा बल्क ड्रग्ज पार्क प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे उदय सामंत हे या सभेत टीकेच्या केंद्रस्थानी असण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रवक्ते भरत गोगावले यांचाही उद्धव ठाकरे यांच्याकडून समाचार घेतला जाण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच इतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचाही समाचार या सभेत उद्धव ठाकरे यांच्याकडून घेण्याची शक्यता आहे.

सभेची जय्यत तयारी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची महाड येथील सभेची जय्यत तयारी सुरु आहे. या सभेतून उद्धव ठाकरे यांच्यासह सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव स्थानिक शिंदे गटाचा कशा पद्धतीने समाचार घेणार? याची आतुरता महाडकरांना लागली आहे. या सभेत महाडमधील स्व. माणिक जगताप यांच्या कन्या आणि भाऊ यांच्यासह हजारो काँग्रेस कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत.

सभेस उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार असून यांच्या समवेत सुभाष देसाई, सुषमा अंधारे, भास्कर जाधव, अनंत गीते हे देखील उपस्थित राहत आहेत. जागेची क्षमता पाहता शहरात देखील स्क्रीनच्या माध्यमातून लोकांना ही सभा पाहता येणार आहे. या पक्ष प्रवेशामुळे पक्षाची ताकत वाढणार असून या सभेला तुफान गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Updated : 6 May 2023 9:58 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top