उध्दव ठाकरे यांनी केले भाजप नेत्याचे कौतूक
नागपूरमध्ये झालेल्या वज्रमूठ सभेतून उध्दव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्याचे कौतूक केले.
X
Uddhav Thackeray News : छत्रपती संभाजीनगरनंतर विदर्भातील नागपूरमध्ये (Nagpur) झालेल्या जाहीर सभेत बोलताना उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीका केली. मात्र यावेळी देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayi) यांचे आभार मानले.
उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली. मात्र हे उलट्या पायाचे सरकार आल्यापासून राज्यात अवकाळी, गारपीटसारखे संकट येत आहेत. आम्ही काम करून दाखवले आणि मग सभा घेत आहोत. पण राज्यात शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री सभा घेत आहेत. त्याबरोबरच हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याआधी कधी आयोध्येला गेले होते का? चंद्रकांत पटील आयोध्येला गेले होते का? असा सवाल करत चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यावर केलेल्या वक्तव्याचाही उध्दव ठाकरे यांनी समाचार घेतला.
तसेच उध्दव ठाकरे यांनी हिंडेनबर्गवरूनही (Hindenburg) पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले, चला हिंडेनबर्ग फालतु असेल मग इतके का हादरलात? राहुल गांधी यांना अपात्र ठरवले. सत्यपाल मलिक (Satyapal Malik) तर भाजपचे त्यांनी केलेल्या गौफ्यस्फोट मानणार की नाही? त्यांनी भयंकर गोष्टी सांगितल्या. वाजपेयी म्हणायचे सरकारे येतील जातील पण देश असायला हवा, असं म्हणत उध्दव ठाकरे यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे कौतूक केले.