Home > Politics > उध्दव ठाकरे यांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर

उध्दव ठाकरे यांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर

माझ्या पाठीत खंजीर खुपसणारा शिवसेनेचा मुख्यमंत्री असू शकत नाही, अशी टीका उध्दव ठाकरे यांनी केली होती. त्याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.

उध्दव ठाकरे यांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर
X

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वपक्षाविरोधात बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यामध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हा माझ्या पाठीत वार करणारा शिवसेनेचा मुख्यमंत्री असू शकत नाही, असं म्हटलं होतं. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फुट पडली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. तर उध्दव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर बोलताना एकनाथ शिंदे यांनी हे शिवसेना भाजपचे सरकार असल्याचे म्हटले आहे. मात्र उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना माझ्या पाठीत खंजीर खुपसणारा शिवसेनेचा मुख्यमंत्री नसल्याचे म्हटले. तर त्यानंतर एकनाथ शिंदे यांची नेतेपदावरूनही हकालपट्टी करण्यात आली.

याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता शिंदे म्हणाले की, मी याबद्दल काही बोलणार नाही. मात्र योग्य वेळी यावर बोलेन असंही एकनाथ शिंदे एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत म्हणाले.

त्यामुळे एकनाथ शिंदे हे उध्दव ठाकरे यांना नेमकं कधी उत्तर देणार? आणि ती योग्य वेळ कधी असणार आहे, याबाबत सर्वांची उत्सुकता ताणली गेली आहे.

Updated : 2 July 2022 11:58 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top