उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे नितीन देसाई यांचा करत होते मानसिक छळ, नितेश राणे यांचा आरोप
नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर राज्यात राजकारण तापलं होतं. त्यातच आता भाजप नेते नितेश राणे यांनी एन डी स्टुडिओ विकण्यासाठी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचा दबाव होता, असा गंभीर आरोप केला आहे.
XUddhav Thackeray And Rashmi Thackeray pressurized to Nitin Desai said Nitesh Rane
बॉलिवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी 2 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर एडवाईज कंपनीच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र एका बाजूला हे सुरू असतानाच भाजप नेते नितेश राणे यांनी या प्रकरणात थेट उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचे नाव असल्याचे म्हटले आहे.
नितेश राणे यांनी म्हटले की, सामनात नितीन देसाई यांच्याबद्दल लेख लिहीण्यात आला. मात्र नितीन देसाई कर्जात बुडाले असताना एनडी स्टुडिओ विकण्यासाठी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचा दबाव होता. एनडी स्टुडिओ आम्हाला द्या, असं म्हणत उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे नितीन देसाई यांचा मानसिक छळ करत असल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला. तसेच उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या माणसाकडून नितीन देसाई यांच्यावर दबाव टाकण्यात येत असल्याचेही नितेश राणे म्हणाले.
नितेश राणे पुढे म्हणाले, ठाकरे चित्रपटाचे शुटिंग नितीन देसाई यांच्या स्टुडिओमध्ये करण्यात आले होते. त्याचेही पैसे दिले होते का? असा सवाल नितेश राणे यांनी विचारला.