गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न सरकारने पूर्ण केले – देवेंद्र फडणवीस
X
बीड जिल्ह्यातील बहू प्रतिक्षित आष्टी-अहमदनगर रेल्वे मार्गाचे उद्घानट शुक्रवारी करण्यात आले. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी जे स्वप्न पाहिले होते ते या सरकारने पुर्ण केले, अखेर आष्टी-अहमदनगर रेल्वे मार्गावर धावली असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
रेल्वेचा पहिला टप्प सुरू झाला आहे पण पुढील काळात वेगाने काम पूर्ण होईल, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. 1995 साली हा रेल्वे मार्ग मंजूर झाला होता. पण हे काम बरीच वर्षे रखडले होते. तब्बल 22 वर्षांनंतर या रेल्वे मार्गावर प्रत्यक्ष पॅसेंजर रेल्वे धावली, हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी आष्टीकरांनी मोठी गर्दी केली होती. अहमदनगर आणि बीड या दोन जिल्हयांना हा मार्ग जोडणार आहे. मार्च 2023 पर्यंत बीडपर्यंत रेल्वे धावेल असा विश्वास रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.