Home > Politics > Mahua Moitra : तृणमुल खासदार महुआ मोइत्रा यांनी संसदेत दिली शिवी

Mahua Moitra : तृणमुल खासदार महुआ मोइत्रा यांनी संसदेत दिली शिवी

तृणमुल काँग्रेसच्या फायरब्रँड (TMC leader Mahua Moitra) नेत्या आणि खासदार महुआ मोइत्रा यांनी संसदेत शिवराळ भाषेचा वापर केल्याने खळबळ उडाली आहे.

Mahua Moitra : तृणमुल खासदार महुआ मोइत्रा यांनी संसदेत दिली शिवी
X

तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा (Mahua Moitra) आपल्या भूमिकांमुळे आणि लोकसभेतील भाषणांमुळे कायम चर्चेत असतात. त्यातच सध्या अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये महुआ मोइत्रा यांनी तेलगू देसम पार्टीचे खासदार के. राममोहन नायडू (K Rammohan Naydu) यांच्या भाषणादरम्यान शिवी दिल्याने लोकसभेत गोंधळ उडाला. त्यानंतर भाजप खासदारांनी महुआ मोइत्रा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत सभागृह बंद पाडले. यानंतर महुआ मोइत्रा यांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरु होती. त्यावेळी तेलगू देसम पक्षाचे खासदार के. राममोहन नायडू यांचे भाषण सुरु होते. त्यावेळी महुआ मोइत्रा लोकसभेत आपल्या जागी बसल्या होत्या. त्यावेळी त्यांनी माइक्रोफोनवर मोठ्या आवाजात 'हरामी' शब्दाचा उच्चार केला. त्यातच महुआ मोइत्रा यांचा आवाज रेकॉर्ड झाल्याने सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी आक्रमक होत महुआ मोइत्रा यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर महुआ मोईत्रा यांनी भाजप खासदार रमेश विधुडी यांचा व्हिडीओ ट्वीट केला. त्यामध्ये भाजपाने दिखाई औकात, असं म्हटलं आहे. या व्हिडीओवर मोइत्रा यांनी म्हटले आहे की, मी स्पष्टपणे आहे त्याला स्पष्टपणे कत्तल करणारा म्हटले, असं ट्वीट केले आहे. मात्र महुआ मोइत्रा यांनी संसदेत वापरलेल्या शब्दावरून सत्ताधारी मोइत्रा यांना घेरणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे महुआ मोइत्रा यांच्या माफीवर हे सगळं प्रकरण शांत होणार की कारवाई हे आज संसदेत स्पष्ट होईल.

सोशल मीडियावर #Harami शब्द होतोय ट्रेंड

महुआ मोइत्रा यांनी के.राममोहन नायडू यांच्या भाषणादरम्यान 'इतने हरामी लोग..' असं वक्तव्य केल्याचे व्हिडीओ अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यामध्ये सुधानिधी बंडोपाध्याय यांनी म्हटले की, महुआ मोइत्रा यांनी संसदेत 'हरामी' शब्द वापरणे ही बंगालसाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. आपण विरोध आणि टीका समजू शकतो. पण हे अपशब्द कशासाठी? जनतेच्या विश्वासामुळे भाजपचा विजय झाला. त्यामुळेच त्यांची निराशा उघडपणे दिसून येत असल्याचे सुधानिधी बंडोपाध्याय यांनी म्हटले आहे.

Updated : 8 Feb 2023 9:54 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top