आता मुंबईत `टिपू सुलतान` ;शिवसेना वि. भाजप संघर्ष आणखी पेटणार?
X
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना मुंबईत आता पुन्हा नामकरणावरुन नवा वाद सुरु झाला आहे.मालाडमधील मालवणी परीसरातील उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरुन शिवसेना- भाजपा वाद उफाळला आहे. या नामकरनाला भाजपनं प्रखर विरोध केला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्यानाला टिपु सुलतानचे नाव देण्याला विरोध दर्शवला आहे. मालाडमधील मालवणी या परिसरातील उद्यानाला टिपु सुलतानचे नाव देण्यावरुन नवा वाद सुरु झाला आहे.कॉंग्रेसचे मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या निधीतुन मैदानाचे काम करण्यात आलं आहे.याचा नामकरण सोहळा लवकरचं पार पडणार असुन भाजपाने याचा तीव्र विरोध केला आहे.
कॉंग्रेसचे स्थानिक आमदार आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आमदार निधीतुन करण्यात आलेल्या मैदानचं टिपु सुलतान क्रिडासंकुल असे नामकरण करण्यात येणार आहे.याचा लोकार्पण सोहळा लवकरच करण्यात येणार असल्याचे फलक मालवणी परिसरात लावले आहेत. याला भाजपाने तीव्र विरोध केला आहे. टिपु सुलतानने हिंदुंवर अत्याचार केले, टिपु सुलतान आमचा देशगौरव होऊ शकत नाही,त्यामुळे त्याचं नाव महापालिकेने मैदानाला देणे अतिशय चुकीचे आहे.जो निर्णय घेण्यात आला आहे, तो रद्द केला पाहीजे, असे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी म्हटलं आहे.