Home > Politics > हा खऱ्या शिवसेनेचा विजय : कोर्टाच्या निकालावर बंडखोर एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रीया

हा खऱ्या शिवसेनेचा विजय : कोर्टाच्या निकालावर बंडखोर एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रीया

हा खऱ्या शिवसेनेचा विजय : कोर्टाच्या निकालावर बंडखोर एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रीया
X

राज्यातील सत्तानाट्याचा खेळ अखेर सुप्रिम कोर्टात पोचल्यानंतर कोर्टानं आमदाराच्या अपात्रतेबाबत ११ जुलै पर्यंत निर्णय घेऊ नये असा आदेश दिल्यानंतर गुवाहटीमधे असलेल्या बंडखोर आमदाराचे नेते एकनाथ शिंदेंनी पहीली प्रतिक्रीया देत हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवेसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांचा विजय असल्याचं म्हटल आहे.

स्वपक्षाविरोधात बंड करणाऱ्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी, प्रतोद सुनील प्रभू यांना सर्वोच्च न्यायलयाने आज नोटीस बजावली. आपलं म्हणणं मांडण्यासाठी तिन्ही पक्षांना वेळ देण्यात आला आहे. पाच दिवसांत त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायालयाने ११ जुलैची असेल असं स्पष्ट केलं आहे.

या सुनावणीदरम्यान आपल्या प्रतिज्ञापत्रात बंडखोर आमदारांनी आपला पाठिंबा महाविकास आघाडी सरकारला नसल्याचं म्हटलंय. त्यामुळेच ठाकरे सरकार अल्पमतात आलं आहे. त्यातच आता ११ जुलै रोजी सुनावणी होणार असल्याने तोपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बहुमत चाचणी होणार की नाही यासंदर्भातील संभ्रम कायम आहे. असं असलं तरी न्यायलयाने यासंदर्भात शिवसेनेला आणि पर्यायाने ठाकरे सरकारला काहीसा दिलासा देणार निर्णय दिलाय.

न्यायालयाच्या निर्णयावर ट्विट करत एकनाथ शिदेंनी #REALSHIVSENAWINS असा हॅशटॅग दिला आहे.

Updated : 27 Jun 2022 6:10 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top