Home > Politics > पंजाब , उत्तराखंडमध्ये काँग्रेसला 'अच्छे दिन'; पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेनुसार सत्ता येण्याची शक्यता

पंजाब , उत्तराखंडमध्ये काँग्रेसला 'अच्छे दिन'; पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेनुसार सत्ता येण्याची शक्यता

पंजाब , उत्तराखंडमध्ये काँग्रेसला अच्छे दिन; पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेनुसार सत्ता येण्याची शक्यता
X

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. यादरम्यान काँग्रेसने जनमताचा कौल जाणून घेण्यासाठी काँग्रेसने अंतर्गत सर्व्हे केला , ज्यात पक्षाला मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. या सर्व्हेनुसार उत्तराखंडमध्ये काँग्रेस पूर्ण बहुमतासह सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. मात्र मागच्यावेळेपेक्षा काँग्रेसच्या जागा घटतील, असे या सर्व्हेमध्ये म्हटले आहे. सध्या उत्तराखंडमध्ये भाजपाचे सरकार आहे. मात्र गेल्या पाच वर्षात भाजपाला चांगली कामगिरी करता आलेली नाही.

तर पंजाब काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत वाद सुरू आहेत, त्या पार्श्वभूमीवर हा अंतर्गत सर्व्हे काँग्रेससाठी दिलासा देणारा आहे. मात्र, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांच्या बंडखोरीनंतर त्यांचा प्रभाव असलेल्या भागात काँग्रेसच्या जागा घटू शकतात. उत्तर प्रदेशमधील सर्व्हेचा विचार केल्यास राज्यात मागच्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसची कामगिरी चांगली होण्याची शक्यता आहे. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला केवळ 7 जागांवर विजय मिळाला होता. मात्र, गेल्या काही काळापासून प्रियंका गांधी यांनी दाखवलेल्या सक्रियतेमुळे पक्षसंघटनेला बळ मिळाले आहे. त्याचा फायदा काँग्रेसला होणार आहे. तर भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष काही मोजक्या जागा मैत्रिपूर्ण लढवण्याची शक्यता आहे.

Updated : 19 Oct 2021 9:40 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top