Home > Politics > वंचितनंतर ठाकरेंना आणखी एक साथीदार मिळणार? अरविंद केजरीवाल मातोश्रीवर

वंचितनंतर ठाकरेंना आणखी एक साथीदार मिळणार? अरविंद केजरीवाल मातोश्रीवर

वंचितनंतर ठाकरेंना आणखी एक साथीदार मिळणार? अरविंद केजरीवाल मातोश्रीवर
X

राज्याच्या राजकारणात रोज अनेक घटना घडत आहेत. आता महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejirval ) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. शिवसेनेतील बंडखोरीमुळे गेल्या वर्षी महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही पक्षावर दावा ठोकला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला. शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्हही उद्धव ठाकरेंनी गमावले आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याचिका दाखल केली असली तरी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड पाहायला मिळाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान, आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.

Updated : 24 Feb 2023 10:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top