देवेंद्र फडणवीस जवाब दो, सुप्रिया सुळे यांचा सवाल
X
राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. राज्यपाल हेसंवैधानिक पद आहे पण कोश्यारी हे सातत्याने महाराष्ट्राचा अपमान करत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. एवढेच नाही तर राज्यपाल समाजात तेढ निर्माण करण्याचे पाप करत आहेत, काहीतरी गडबड व्हावी असा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत, राज्यपालांची भूमिका त्यांना पटते का हे स्पष्ट करावे आणि राज्यपालांच्या वक्तव्याचा ते जाहीर निषेध करतील अशी अपेक्षा आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. एवढेच नाही तर राष्ट्रपतींनी राज्यपालांना परत बोलावून घ्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.देवेंद्र फडणवीस जवाब दो, सुप्रिया सुळे यांचा सवाल